सेक्स आरोग्यः ...आणि त्याचं लिंग हाताला चिकटवलं गेलं

इंग्लंडमधील माल्कम मॅकडॉनल्ड यांना शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे तब्बल सहा वर्षे त्यांचं लिंग हाताला जोडून ठेवावं लागलं होतं.

47 वर्षीय माल्कम हे इंग्लंडमधील नॉरफोकमधील आहेत.

न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, 2010 मध्ये माल्कम यांच्या पेरिनअम (Perineum, गुदद्वार आणि लिंग यामधील जागा) मध्ये संसर्ग झाल्यानं त्यांचं लिंग वेगळं झालं होतं.

डॉक्टरांनी माल्कम यांची कातडी वापरून ते लिंग त्यांच्याच हाताला शस्त्रक्रियेद्वारे जोडून दिलं.

खरंतर माल्कम यांनी कृत्रिम लिंग बसवून घेण्याचा प्रयत्न केला. शस्त्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. रक्तात ऑक्सिजनची कमतरता असल्यानं ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया थांबवण्यात आली आणि 'तात्पुरतं' लिंग हाताला जोडण्यात आलं.

ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर अनेकजण माल्कम यांची खिल्ली उडवत होते. त्याबद्दल ते म्हणतात की, "लोक मला पब किंवा इतर ठिकाणी भेटल्यावर याबद्दल विचारतात आणि विनोदही करतात. मात्र, ते सहाजिक आहे. कारण तुम्ही एखाद्याच्या हातावर कधी लिंग पाहत नाही. त्यामुळे त्यात नवल वाटणं सहाजिक आहे. मीही त्या खिल्लीचा, विनोदांचा आनंद घेतो. कारण तसंही माझ्याकडे दुसरा पर्याय नाही."

माल्कम यांची ही प्रतिक्रिया न्यूयॉर्क पोस्टनं दिलीय.

माल्कम यांच्यावरील दुसरी शस्त्रक्रिया होण्यास सहा वर्षांचा उशीर झाला आणि शेवटी 2021 मध्ये सलग 9 तास शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया मात्र यशस्वी झाली.

या दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर माल्कम यांना अखेर एखाद्या 'पुरुषासारखं' वाटू लागलं.

'द मॅन विथ अ पेनिस ऑन हिज आर्म' या नव्या डॉक्युमेंट्रीनुसार, माल्कम म्हणाले की, "शस्त्रक्रियेनंतर जेव्हा पहिल्यांदा मी खाली पाहिलं, तेव्हा माझे पहिले शब्द होते की, अरे वाह, अखेर त्यांनी योग्य ठिकाणी लिंग बसवलंय."

न्यूयॉर्क पोस्टनुसार, माल्कम यांना आता बरं वाटू लागलंय की, ते त्यांचं लैंगिक आयुष्य पुन्हा सुरू करू शकतील.

पण त्याचवेळी ते हेही नमूद करतात की, या खऱ्या लिंगापेक्षा ते कृत्रिम लिंगही चांगले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)