पाकिस्तान : इम्रान खान आता पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान ; अध्यादेश जारी

इम्रान खान

फोटो स्रोत, Reuters

इम्रान खान आता तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नाहीत. यासंदर्भात कॅबिनेटने अध्यादेश जारी केला आहे. यानुसार पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार कलम 58(1) संसद बरखास्त झाल्यामुळे इम्रान खान आता पंतप्रधानपदी नाहीत.

घटनेच्या कलम 224 अ (4) अंतर्गत इम्रान खान आता काळजीवाहू पंतप्रधान असतील असं या अध्यादेशात म्हटलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव सभापतींनी फेटाळला आहे. तसंच देशातील संसद बरखास्त करण्याची शिफारसही पंतप्रधान इम्रान खान यांनी यावेळी केली होती.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राष्ट्रीय संसद विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय संसद विसर्जित करण्याची केलेली शिफारस पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संविधानाच्या कलम 58 (1) अंतर्गत स्वीकारली आहे.

अविश्वास ठरावाच्या बाजूने किती मतं?

प्रतिकात्मक अधिवेशनाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते अयाज सादिक यांनी सांगितले की, अविश्वास ठरावाच्या बाजूने 197 मतं पडली आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी शहजाद मलिक सांगतात की, न्यायालयाचे कर्मचारी आता हळूहळू येत आहेत. इम्रान खान सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाबाहेर स्पेशल ब्रांचचे सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. हे कर्मचारी शक्यतो सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश येणार असतील तर न्यायालयात तैनात असतात.

शहजाद मलिक यांच्या मते, पीपीपीचे महासचिव नैय्यर बुखारी यांचे वकील त्यांच्या वतीने याचिका घेऊन न्यायालयाबाहेर पोहोचले आहेत.

इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (3 मार्च) देशाला संबोधित करताना सांगितले की, त्यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना संसद विसर्जित करण्याची शिफारस केली आहे आणि जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी.

राष्ट्रीय संसदेत आपल्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली.

रविवारी (3 मार्च) ठरावावर मतदान होण्यापूर्वीचं सभागृहाचे उपसभापती कासिम सूरी यांनी तो घटनाबाह्य ठरवून फेटाळला. त्यांनी अविश्वास ठरावाला घटनेतील कलम 5 चे उल्लंघन ठरवले.

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, "देशातील जनतेने निवडणुकीची तयारी करावी. या देशाचे भविष्य ठरवण्याचा अधिकार इतर कोणाला नाही. पाकिस्तानची जनताच ते ठरवेल."

"आज सभापतींनी अविश्वास ठराव फेटाळला आहे, त्याबद्दल मी संपूर्ण जनतेचे अभिनंदन करतो. कालपासून सगळे तणावाखाली होते, मला विचारत होते, मी त्यांना सांगू इच्छितो की घाबरू नका."

"आज ज्या प्रकारे सभापतींनी आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून निर्णय घेतला आहे, त्यानंतर मी राष्ट्रपतींकडे संसद विसर्जित करण्याचा निर्णय सुपूर्द केला आहे."

पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात मतदान करण्यापूर्वीच राष्ट्रीय संसदेच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्तावाला असंवैधानिक ठरवून फेटाळले. उपसभापती कासिम खान सूरी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेचे अधिवेशन सुरू होते.

कलम 58 काय सांगते?

त्यानंतर लगेचच, इम्रान खान सरकारमधील माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी ट्वीट केले की, राष्ट्रीय संसद बरखास्त करण्याचा पंतप्रधानांचा सल्ला घटनेच्या कलम 58 अंतर्गत राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांना पाठवण्यात आलाय.

पाकिस्तानी राज्यघटनेच्या कलम 58 नुसार, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना राष्ट्रीय संसद विसर्जित करण्याचा सल्ला दिल्यास, राष्ट्रपतींनी ती विसर्जित करणे आवश्यक असतं. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सल्ला दिल्यानंतर 48 तासांनंतर संसद आपोआप विसर्जित झाल्याचे मानले जाईल.

सरकारने संविधानाचं उल्लंघन केलंय

संसदेतील अविश्वास ठराव रद्द केल्यानंतर आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या राष्ट्रीय संसद बरखास्त करण्याच्या प्रस्तावानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो म्हणाले की, सरकारने संविधानाचे उल्लंघन केले आहे. "संयुक्त विरोधी पक्ष संसदेतून जाणार नाही. आमचे वकील सुप्रीम कोर्टात जात आहेत. आम्ही सर्व संस्थांना आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानच्या संविधानाचे पावित्र्य राखावे आणि त्याचे संरक्षण करावे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज (रविवार, 3 एप्रिल) मतदान होणार होतं. पण मतदानापूर्वीच संसदेच्या सभापतींनी हा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं कारण देत फेटाळून लावला.

इम्रान खान यांनी जनतेला संबोधित करताना काय म्हटलं?

घटनेच्या कलम 5 नुसार अविश्वास प्रस्ताव अवैध असल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं. यानंतर पंतप्रधान इम्रान खान जनतेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय वाहिनीवर आले. त्यांनी राष्ट्रपतींना देशाची संसद बरखास्त करण्याची, तसंच पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे.

यानंतर बोलताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, "परकीय शक्तींच्या साथीने सरकार पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. आता जनतेनं ठरवावं की त्यांना कोण हवं आहे. संसद बरखास्त करण्यात यावी, निवडणुका आयोजित करण्यात याव्यात. लोकांनी निवडणुकांची तयारी करावी. देशाचं भविष्य काय असेल हे जनतेनं ठरवावं, परकीय शक्तींनी नाही".

यासाठी पाकिस्तान संसदेचं विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे. या सत्राची सुरुवात आज पाकिस्तानी प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास झाली. यादरम्यान पाकिस्तानच्या संसदेत नेमकं काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष होतं.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं होतं.

अविश्वास प्रस्तावावरील मतदानावरच इमरान खान 'तहरिक-ए-इन्साफ' पक्षाच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याने यामध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

इम्रान खान

फोटो स्रोत, PTIOFFICIAL

अविश्वास प्रस्तावावर मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 2 एप्रिल रोजी संध्याकाळी इम्रान खान यांनी दुसऱ्यांदा लोकांना संबोधून भाषण केलं. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

विरोधकांनी परकीय शक्तींसोबत मिळून आपलं सरकार पाडण्याचं षड्यंत्र रचल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

"राष्ट्रीय सुरक्षा समिती आणि मंत्रिमंडळाने यासंदर्भातील कागदपत्रे पाहिली आहेत. इम्रान खान यांना हटवलं तर अमेरिकेसोबतचे संबंध चांगले होतील, अशा स्वरुपातील काही अधिकृत कागदपत्रे आहेत," असं खान म्हणाले.

तसंच त्यांनी शाहबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की त्यांचं या संपूर्ण प्रकरणात संगनमत आहे. शाहबाज हे अमेरिकेची गुलामी करण्यास सज्ज झाले आहेत."

अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला

पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मतदानापूर्वीच संसदेच्या उपसभापतींनी फेटाळला आहे. विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी हुमैरा कंवल यांनी याविषयी सांगितलं की संसदेत दाखल होणाऱ्या खासदारांची संख्या वाढू लागली आहे. पण अद्याप इम्रान खान याठिकाणी पोहोचले नाहीत.

इम्रान खान काय म्हणाले?

इम्रान खान यांनी यावेळी संसदेच्या सभापतींचं अभिनंदन केलं. त्यांनी हे षड्यंत्र उधळून लावल्याने त्यांचे मी आभार मानतो, असं खान म्हणाले.

या देशातील सरकारचा निर्णय देशातील जनतेने घ्यावा, परकीय शक्तींनी त्यात हस्तक्षेप करू नये, असं खान म्हणाले.

देशाची संसद बरखास्त करत असल्याची घोषणा इम्रान खान यांनी यावेळी केली. तसंच लोकांनी आता निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करावी, असंही खान म्हणाले.

तरुणांनी रस्त्यावर उतरावं

इम्रान खान यांनी आपल्या भाषणादरम्यान तरुणांना विशेष आवाहन केलं. त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी देशातील रस्त्यांवर उतरावं, असं ते म्हणाले आहेत.

पाकिस्तान संसद

खान यांच्या मते, विरोधी पक्षाने देशासोबत गद्दारी केला आहे. त्यामुळे त्यांचा विरोध या आंदोलनांच्या माध्यमातून झाला पाहिजे.

लष्कराकडून कोणतीही अडचण नाही

लष्कराशी संबधित एका प्रश्नाचं उत्तर देताना इम्रान खान म्हणाले, "सध्याच्या स्थितीत पाकिस्तानला लष्कर आणि तहरिक-ए-इन्साफ पक्ष यांनीच एकत्र बांधून ठेवलं आहे. पाकिस्तानला एका मजबूत लष्कराची गरज आहे. लष्करावर केलेली टीका ही संपूर्ण पाकिस्तानवर टीका आहे. लष्कराचं नुकसान होईल, अशी कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)