Paislee Shultis: तीन वर्षांपूर्वी गायब झालेली चिमुरडी आढळली तळघरात जिवंत

पैसली शुल्टीस, अमेरिका, लहान मुलं, गुन्हेगारी, कायदा

फोटो स्रोत, SAUGERTIES POLICE

फोटो कॅप्शन, पैसली शुल्टीस

तीन वर्षांपूर्वी गायब झालेली लहान मुलगी जिन्याखालच्या एका गुप्त खोलीत जिवंत आढळली आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क पोलिसांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.

पैसली शुल्टीस ही 6 वर्षांची मुलगी सोमवारी सौगेरटीस इथे हाती घेण्यात आलेल्या शोधमोहिमेरम्यान सापडली.

तिची तब्येत चांगली असून, तिचा सांभाळ करणारे आणि तिची बहीण यांच्याशी तिची भेट झाली आहे असं पोलिसांनी सांगितलं.

तिचे आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुलै 2019 मध्ये न्यूयॉर्कजवळच्या तिओगा काऊंटी भागातून पैसली बेपत्ता झाली होती. तेव्हा ती चार वर्षांची होती.

तिच्या पालकांनीच म्हणजे किंबर्ले कूपर (33) आणि किर्क शुल्टीस ज्युनियर (32) यांनीच तिचं अपहरण केल्याचा अंदाज तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.

पैसली हिला सौगेरटीस इथे एका गुप्त ठिकाणी लपवण्यात आलं आहे अशी माहिती उल्स्टर पोलिसांना मिळाली. या घरात शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च वॉरंट तयार केलं. या ठिकाणी आधीही पैसलीचा शोध घेण्यात आला होता.

57 वर्षीय किर्क शुल्टीस सीनियर यांची ही मालमत्ता आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा किर्क तिथे हजर होते. पैसली कुठे आहे याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

तासभर शोध घेतल्यानंतर शोधकर्त्यांना या वास्तूच्या तळघराकडे जाणारा जिना विचित्र स्थितीत असल्याचं आढळलं.

अनेक खोके बाजूला केल्यानंतर पोलिसांना पैसली दिसली. अतिशय छोट्या, थंड आणि ओलसर जागी पैसली होती.

वैद्यकीय तज्ज्ञांनी पैसलीच्या प्रकृतीची तपासणी केली. तिची तब्येत चांगली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

किंबर्ले कूपर, किर्क शुल्टीस ज्युनियर तसंच शुल्टीस सीनियर या तिघांना अटक करण्यात आली. पैसलीला बेपत्ता केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पैसलीचे वडील आणि त्यांच्या वडिलांना जामिनावर सोडण्यात आलं आहे.

कूपरबाईंना मात्र उल्स्टर तुरुंगातच ठेवण्यात आलं आहे.

याप्रकरणी तपास सुरू असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)