आरोग्य: हृदयविकाराचा धोका कमी करायचाय? मग दररोज रात्री 10 वाजता झोपा

आरोग्य, झोप

फोटो स्रोत, Getty Images

रात्री 10 ते 11 दरम्यान झोपणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. 88 हजार स्वयंसेवकांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं संशोधकांनी सांगितलं.

युके बायोबँकसाठी काम करणाऱ्या टीमनुसार, आपल्या शरीराच्या वेळपत्रकाच्या आवश्यकतेनुसार झोप घेतल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.

दिवसाच्या 24 तासांसाठीची शरीराची नैसर्गिक गती सांभाळली तर ते आरोग्य आणि एकूणच मानसिक सतर्कतेसाठी महत्त्वाचं ठरतं. याचा रक्तदाबासारख्या गोष्टींवरही परिणाम होत असतो.

संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना घड्याळाप्रमाणे एक उपकरण देण्यात आलं होतं. याद्वारे त्यांची झोपण्याची आणि जागण्याची माहिती मिळवली जात होती. सहा वर्षे या स्वयंसेवकांच्या हृदय आणि रक्ताभिसरणाच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला.

यापैकी केवळ 3 हजार हून अधिक प्रौढांना हृदयरोग झाला. यापैकी बहुतांश लोक रात्री 10 ते 11 वाजल्यानंतर किंवा त्याआधी झोपत होते. झोपेचा कालावधी आणि झोपेमध्ये अनियमिततासुद्धा आढळली.

संशोधकांनी इतर अनेक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जी हृदयासंबंधी धोका वाढवते. उदा. वय, वजन, कोलेस्टेरॉलची पातळी, परंतु या अभ्यासातून कारण आणि परिणाम सिद्ध होऊ शकत नाहीत.

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हार्टअॅटॅक टाळायचाय? मग रात्री 10 वाजता झोपा Heart Attack, Sleep at 10

फोटो स्रोत, Getty Images

एक्झेटर विद्यापीठातील अभ्यासकाचे लेखक डॉ. डेव्हिड प्लॅन्स म्हणाले, "आपल्या अभ्यासातून आपण कारणांचा शोध घेऊ शकत नसलो, तरी या निकालांवरून असे दिसून येते की, लवकर किंवा उशिरा झोपण्याच्या वेळांमुळे शरीराच्या वेळापत्रकात व्यत्यय येण्याची शक्यता जास्त असते आणि हृदयवाहिन्यासंबंधी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

"सर्वात धोकादायक वेळ मध्यरात्रीनंतरची आहे कारण यामुळे शरीराचे नव्याने वेळापत्रक सुरू करणारा सकाळचा प्रकाश दिसण्याची शक्यंता कमी होते."

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या वरिष्ठ कार्डियाक नर्स रेजिना गिब्लिन म्हणाल्या,"या अभ्यासानुसार रात्री 10 ते 11 च्या दरम्यान झोपणं ही बहुतेक लोकांसाठी आपलं हृदय दीर्घकालीन निरोगी ठेवण्यासाठी योग्य वेळ असू शकते."

"दरम्यान, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा अभ्यास केवळ एक संबंध दाखवू शकतो. कारण आणि परिणाम सिद्ध करू शकत नाही. हृदय आणि रक्ताभिसरण आजारांसाठी धोका ओळखण्यासाठी म्हणून झोपेच्या वेळेमध्ये आणि कालावधीमध्ये अधिक संशोधनाची आवश्यकता आहे."

आपल्या सामान्य आरोग्यासाठी तसंच हृदय आणि रक्ताभिसरणासाठी पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे. प्रौढांनी दररोज सात ते नऊ तास झोपलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.

"पण झोप हा एकमेव घटक नाही जो हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. तुमची जीवनशैलीसुद्धा महत्त्वाची आहे. उदा. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी याची माहिती घेणे, निरोगी वजन राखणे आणि नियमितपणे व्यायाम करणे, मीठ आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे आणि संतुलित आहार घेणे या बाबी आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)