ब्रिटिश खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images / Zoe Norfolk
ब्रिटनमधले कन्झर्व्हेटिव्ह खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यांच्या मतदार संघात लोकांच्या गाठीभेटी घेत असताना हा हल्ला करण्यात आला होता.
एसेक्समधल्या ली-ऑन-सी भागामध्ये ब्रिटीश वेळेनुसार दुपारी 12 वाजता ही घटना घडली. यामध्ये संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आलेली असून पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त केलाय.
69 वर्षांचे सर डेव्हिड एमेस हे 1983 पासून खासदार होते. त्यांना 5 मुलं आहेत.
ली - ऑन - सी भागातल्या बेलफेअर्स मेथॉडिस्ट चर्चमध्ये एमेस यांची सभा सुरू होती. हा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्यावर चाकू हल्ला झाला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




