You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Kim Jong-un: उत्तर कोरियात क्रूज मिसाईलच्या यशस्वी परीक्षणाचा दावा
दूरपर्यंत झेपावणाऱ्या क्रूज मिसाईलचं यशस्वी परीक्षण केल्याचा दावा उत्तर कोरियानं केलाय.
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमानुसार, शनिवार आणि रविवारी दोन मिसाईल लॉन्च करण्यात आले. या मिसाईल 1500 किलोमीटरचं अंतर कापू शकतात.
उत्तर कोरियाने यापूर्वी क्रूज मिसाईलचं परीक्षण जानेवारीत केलं होतं, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच हाती घेतली होती.
उत्तर कोरिया आपल्या बॅलिस्टिक मिसाईल आणि अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय बंधनांचा सामना करत आहे.
टोकियोमध्ये अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश उत्तर कोरियातील राजनैतिक संबंधांवर चर्चा करणार असतानाच, उत्तर कोरियात मिसाईल परीक्षाची ही घटना घडल्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली
मार्च 2021 मध्येच उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच अशा प्रकारची चाचणी करण्यात आल्याचं जपानी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरवाअंतर्गत प्योंगयांगला बॅलेस्टिक क्षेपाणास्त्र चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे.
आपल्या प्रदेशातल्या कार्यक्षेत्रातील पाण्यात कोणताही कचरा पडला नाही, असं जपानने स्पष्ट केलं होतं.
उत्तर कोरियाने पूर्व चीन समुद्राच्या उत्तर भागात (येलो सी) दोन बिगर बॅलेस्टिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली होती.
क्रूझ क्षेपणास्त्रांच्या चाचणीवर बंदी नाही. पण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ही घाबरवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक शस्त्र मानली जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)