तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : जगानं तालिबानला मदत करावी, त्यांना योग्य मार्ग दाखवावा - चीन

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, WU HONG - POOL/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी

जगभरातील देशांनी विशेषत: अमेरिकेने तालिबानला मदत करायला हवी असा सल्ला चीनने दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

चीनमधील सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने म्हटलं आहे की अफगाणिस्तानमधली परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. जगातील देशांनी तालिबानशी संपर्क प्रस्थापित करून त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचं सैन्य माघारी घेतल्याने तिथे दहशतवादी संघटना पुन्हा जोमाने फोफावू शकतात याचा चीनने पुनरुच्चार केला आहे.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या विजयाच्या दाव्यावर चीनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

वांग यी यांनी ब्लिंकन यांना म्हटलं, "वस्तुस्थिती पाहिली तर युद्धाने अफगाणिस्तानमधून दहशतवादी गटांना दूर नेलं नाही. हे उद्दिष्ट साध्य झालं नाही. ज्या घाईने अमेरिका आणि नाटो फौजांनी तिथून माघारी परतण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दहशतवादी संघटनांना पुन्हा एकदा तिथे पाय रोवण्याची संधी मिळाली".

दहशतवादाचा बिमोड आणि हिंसाचाराविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानला मदत करण्यात अमेरिकेने ठोस पावलं उचलायला हवी असं वांग यी यांनी ठामपणे म्हटलं आहे.

"अमेरिकेने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करायला हवा. दहशतवादाविरुद्ध लढताना त्यांनी दुतोंडी भूमिका घ्यायला नको".

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधील दृश्य

"अमेरिकेने जगातील अन्य देशांच्या मदतीने अफगाणिस्तानला आर्थिक तसंच माणुसकीच्या नात्याने मदत करायला हवी, ही अफगाणिस्तानची तात्काळ गरज आहे".

वांग यी पुढे म्हणाले, "अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहकार्याने अफगाणिस्तानमध्ये राजकीय प्रारुप विकसित करण्यात, सरकारी संस्थांनी शांततामय मार्गाने काम करावं, सामाजिक सुरक्षा आणि स्थिरता, महागाई कमी करणे, चलनाचं मूल्य वाढवणं तसंच देशाच्या पुनर्निमार्णात अफगाणिस्तानला सर्वतोपरी सहकार्य करायला हवं".

तालिबानप्रती चीनचं नरमाईचं धोरण

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतरही चीन, रशिया, पाकिस्तान यांनी आपापले दूतावास सुरू ठेवले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये चीनचे राजदूत वांग यू यांनी तालिबानच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली होती.

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर चीननेच सार्वजनिकरीत्या म्हटलं होतं की, तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायला हवेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनियांग यांनी 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं की, "तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी चीन तयार आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी आणि पुनर्निर्माण व्हावं यासाठी काम करण्याच चीनची भूमिका आहे".

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, तालिबान आणि चीन यांच्यात आधीच चर्चा झाली होती.

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच चीनने त्यांच्याशी चर्चा केली होती. त्या चर्चेत तालिबानचं नेतृत्व मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी केलं होतं.

या चर्चेदरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी तालिबानच्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं की, ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट या चीनविरोधी दहशतवादी संघटनेशी तुम्हाला संबंध तोडावे लागतील.

ईटीआयएम ही चीनमधील विगर मुस्लिमांची संघटना आहे. शिनजियांग प्रांत स्वतंत्र देश म्हणून घोषित करावा अशी त्यांची मागणी आहे.

तालिबानप्रति चीनने आधीपासूनच नरमाईचं धोरण स्वीकारलं आहे. आता त्यांनी बाकी देशांनाही तसंच वागण्याचं आवाहन केलं आहे.

चीनला तालिबानशी जवळीक का हवी आहे?

देशांतर्गत विगर मुस्लिमांच्या मुद्यासंदर्भात चिंतेत असल्याने चीनने तालिबानप्रति नरमाईची भूमिका स्वीकारलेली आहे असं विदेशी विषयांचे जाणकार सांगतात.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या शिनजियांग प्रांतात साधारण दहा लाख विगर मुस्लिम राहतात. शिनजियांग प्रांताची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे.

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चीनमध्ये विगर मुस्लिमांचा प्रश्न खदखदतो आहे.

विगर मुस्लीम आणि ईटीआएमचे सदस्य एकत्र येऊन अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करू शकतात अशी भीती चीनला आहे.

अफगाणिस्तान आपल्या जमिनीचा वापर होऊ देणार नाही या अटीवरच चीनने तालिबानला पाठिंबा दिला आहे.

विगर मुस्लिमांच्या शोषणाचा आरोप चीनवर सातत्याने झाला आहे. या कारणामुळेच अमेरिकेसह पाश्चिमात्य देश आणि चीन यांच्यातील संबंध दुरावलेही होते.

अफगाणिस्तानमध्ये चीनचं आर्थिक हित

चीनने वन बेल्ट रोड ही महत्वाकांक्षी योजना राबवली आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पश्चिम आशियाई भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा तसंच कम्युनिकेशन यंत्रणा अद्ययावत असण्याची आवश्यकता आहे.

अफगाणिस्तानकडून चीनला समर्थन मिळालं नाही तर या भागात ही योजना राबवण्यात त्यांना अपयश येऊ शकतं.

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षि जिनपिंग

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हाही आशियाई खंडातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पाकिस्तानमध्ये चीनच्या अधिकाऱ्यांवर हल्ले होत असतात. अशा परिस्थितीत तालिबानशी हातमिळवणी करून परिस्थती नियंत्रणात ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

अफगाणिस्तानातील एनकमध्ये कॉपर खाणींमध्ये, तर अमू दरियात ऊर्जा क्षेत्रात चीनची गुंतवणूक केलीय. अशा बऱ्याच गुंतवणुकी चीननं अफगाणिस्तानात केल्यात.

अफगाणिस्तान हे नैसर्गिक संसाधनाचं भांडार आहे. इथे सोनं, तांबे, लोखंड असे अनेक धातू मुबलक प्रमाणावर मिळतात. अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती प्रतिकूल झाली तर चीनच्या गुंतवणुकीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना तसं होऊ द्यायचं नाहीये.

चीन-अमेरिकेचे संबंध

वांग यी यांनी चीन-अमेरिका संबंधाबाबत बोलताना सांगितलं की, चीन सरकार अमेरिकेचं चीनप्रति धोरण आणि दृष्टिकोन काय आहे याचा विचार करूनच धोरण आखू.

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिका-चीन संबंध

संबंध दुरावण्यापेक्षा परस्परांशी संवाद ही चांगली बाब आहे. संघर्षापेक्षा संवाद महत्त्वाचा. अमेरिकेला चीनबरोबरचे संबंध पूर्वपदावर आणायचे असतील तर चीनची प्रतिमा डागाळवणे आणि चीनवर आक्रमण करण्याची भाषा या गोष्टी पूर्णपणे बंद कराव्या लागतील.

चीनचं सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाशी निगडीत हितकारक गोष्टींचं नुकसान करणंही अमेरिकेनं थांबवायला हवं असं चीनचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)