तालिबान : काबूलहून परतलेल्या एअर इंडियाच्या विमानाची गोष्ट

रविवारी (15 ऑगस्ट) काबूलहून दिल्ली विमानतळावर एअर इँडियाचं विमान पोहचलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रविवारी (15 ऑगस्ट) काबूलहून दिल्ली विमानतळावर एअर इंडियाचं विमान पोहोचलं.
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एअर इंडियाचं एक विमान रविवारी (15 ऑगस्ट) दिल्लीहून काबुलला निघालं. विमानात 40 प्रवासी होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमान उतरवण्यास परवानगीही दिली होती. काबुलचं तापमान 35 डिग्री सेल्सिअस होतं आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता.

मात्र प्रत्यक्षात काबुलमध्ये काय परिस्थिती आहे याची पुसटशी कल्पना विमानातील कर्मचाऱ्यांना नव्हती. तालिबानसाठी लढणाऱ्यांनी काबुलवर ताबा मिळवला होता. तिथलं सरकार कोसळलं होतं आणि अमेरिकेचा तिथे असलेला 20 वर्षांचा वावर संपुष्टात आला होता.

जेव्हा वैमानिक विमान लँड करत होता तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलने त्याला थोडी वाट पाहण्यास सांगितलं. त्याचं कारण मात्र स्पष्ट केलं नाही.

पुढचा दीड तास हे विमान राजधानी काबुलवर 16,000 फूट उंचावरच घिरट्या घालत असल्याचं विमानतळावरील सूत्रांनी सांगितलं.

काबुलच्या विमानतळाच्या आसपास हवेत असताना संपर्क साधण्यास कायमच अडचणी येतात ही बाब ध्यानात घेऊन विमानात अतिरिक्त इंधन भरून ठेवण्यात आलं होतं. काबुलच्या जवळ हवेतील हालचाली कायमच वेगवान आणि गुंतागुंतीच्या असतात, असं वैमानिक सांगतात. सध्या तिथे वेगाने वारे वाहत आहेत त्यामुळे तिथे विमान उडवणं कायमच आव्हानात्मक असतं.

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तालिबानसाठी लढणारे सैनिक (16 ऑगस्ट)

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तालिबानसाठी लढणारे सैनिक (16 ऑगस्ट)

भारताबरोबरच काबुलमध्ये आणखी दोन देशांची विमानं लँड होण्याची वाट पाहत होते.

भारताचं Airbus 320 शेवटी काबुलच्या वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता पोहोचलं. कॅप्टन आदित्य चोप्रा वैमानिक होते.

दिल्लीहून काबुलला जाण्यासाठी 105 ते 120 मिनिटं म्हणजे साधारण दोन तास लागतात. मात्र रविवारी दुपारी या विमानाला साडेतीन तास लागले.

काबुल शहरात काहीतरी गडबड होतेय याची प्रवाशांना कल्पना होती, पण नक्की काय होतंय हे कुणालाच कळत नव्हतं.

रनवेवर अनेक सैनिक उपस्थित होते. हवेतही काही हालचाली सुरू होत्या. पाकिस्तान आणि कतार एअरलाईन्सची विमानं उतरलेली दिसत होती.

"आम्ही असं ऐकलं की काही कामगार विमानतळावरच आसरा घेत होते आणि विमानतळावर लोकांची झुंबड उडाली होती," या विमानातला एक प्रवासी सांगत होता. विमान लँड झाल्यावर कॉकपिटमधील कर्मचारी तिथेच बसून होते. ही काबुलमधील विमानतळावरची पद्धतच आहे.

धावपट्टीवर एक ते दीड तास वाट पाहिल्यानंतर 129 प्रवाशांसह या विमानाने पुन्हा दिल्लीकडे झेप घेतली. त्यात अफगाणिस्तानचे काही अधिकारी होते. दोन खासदार आणि माजी राष्ट्राध्यक्षांचा एक सल्लागार होता. काही जण गर्दीत अडकल्याने त्यांना विमानात बसता आलं नाही.

"एखाद्या देशातील नागरिक आपली मायभूमी सोडण्यासाठी इतके उतावीळ झाल्याचं मी यापूर्वी कधीही पाहिलं नाही. जेव्हा ते विमानात चढले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अगतिकता स्पष्टपणे दिसत होती," एक प्रवासी सांगत होता.

विमानातील बहुसंख्य प्रवासी अफगाणिस्तान सोडून जाणारे नागरिक होते. त्यात काही भारतीय कर्मचारी सुद्धा होते.

संध्याकाळपर्यंत काबूल विमानतळावर जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. विमानतळाच्या आत, अगदी धावपट्टीवरसुद्धा नागरिक जमल्याचे व्हीडिओ समोर येऊ लागले होते. मोठ्या विमान कंपन्या त्यांची विमानं अफगाणिस्तानवरून विमान नेणं टाळत होते.

सोमवारी सकाळी (16 ऑगस्ट) काबुलहून नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे व्हीडिओ समोर आले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या एका विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी विमानात 180 प्रवासी होते. ते विमान कंदाहरला नेण्यात आलं. तिथून कट्टरवाद्यांनी भारत सरकारशी वाटाघाटी केल्या आणि तीन कट्टरवाद्यांना सोडून देण्यात आलं. कोणत्याही अपहरणकर्त्यांना अटक करण्यात यश आलं नाही.

युद्ध संपल्यानंतर एअर इंडियाची विमानं नियमितपणे काबुलला जातात. मात्र आता अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं आहे. सोमवारी काबुलला एक औद्योगिक विमान जाणार होतं असं प्रवक्त्याने सांगितलं.

"एअरस्पेस बंद असेल तर आम्ही जाऊ शकणार नाही" ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)