चीनमधून आलेले गोल्डफिश तलाव आणि नद्यांसाठी 'राक्षस' का ठरत आहेत?

गोल्डफिश

फोटो स्रोत, CITY OF BURNSVILLE

तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेल्या अॅक्वेरियममध्ये जर गोल्डफिश असेल आणि तुम्हाला तो नको असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला जवळच्या तलाव किंवा नदीत सोडाल?

जर तुम्ही असा काही विचार करत असाल तर थोडं थांबा आणि हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण तसं केल्यास तुम्ही एक 'राक्षस' जन्माला घालू शकता, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

अत्यंत सुंदर अशा दिसणाऱ्या या माशांना आपण 'गोल्डफिश' म्हणतो. पण शास्त्रीय भाषेत त्याला 'कॅरेसियस ऑराटस' म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील नद्या, तलाव आणि इतर जल स्त्रोतांमध्ये असलेल्या पाण्यातील जीवांसाठी गोल्डफिश संकटाचं कारण ठरलं आहे.

अॅक्वेरियममध्ये अगदी लहान दिसणारे हे मासे बाह्य जगात फुटबॉलच्या एवढा आकारही घेऊ शकतात. त्यांचं वजन दोन किलोपर्यंत वाढू शकतं.

मांसाहारी मासे

आकार आणि वजनाकडं दुर्लक्ष केल्यास गोल्डफिश हे इतर माशांवर हल्ला करण्याच्या स्वभावाचे असतात. त्यामुळं ज्या ठिकाणी हे मासे असतात तेथील इतर जीवांसाठी ते धोका ठरत असतात.

अमेरिकेच्या मिनसोटा प्रांतात तर लोकांनी हे मासे तलाव आणि नद्यांमध्ये सोडू नये अशी विनंती केली आहे. त्यावरून परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

याठिकाणी असलेल्या 'केले' तलावात मोठ्या आकाराचे गोल्डफिश आढळल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी या माशाला हल्लेखोर प्रजातीचा मासा ठरवलं आहे.

शास्त्रज्ञांच्या मते गोल्डफिश सर्वात आधी चीनमध्ये आढळला होता. त्यानंतर जगभरात हा मासा पसरत गेला. हा मूळ मांसाहारी मासा आहे. तर इतर मासे हे डासांच्या अळ्या खातात (त्यामुळं याला नैसर्गिक कीटकनाशक म्हणतात), तर गोल्डफिशचं मुख्य अन्न हे इतर माशांची अंडी हे असतं.

आजारांचा धोका

अन्न मिळवण्यासाठी गोल्डफिश जी पद्धत अवलंबतात ज्यामुळं जलसाठ्यांच्या तळाशी मोठ्या हालचाली होतात. त्यामुळं इतर समस्या निर्माण होतात. पाण्याच्या खाली असलेला चिखल वर येऊ लागतो आणि त्याजागी पोषक तत्व तरंगत असतात.

यामुळं गोल्डफिशला अन्न तर मिळतं पण त्याठिकाणी शेवाळ तयार होण्याची प्रक्रिया वेगावते. नद्या, तलाव किंवा जलसाठ्यांमध्ये गोल्डफिश फेकल्यानं त्याठिकाणी आधीच उपस्थित माशांना आजारांचा धोका निर्माण होतो आणि त्याची त्यांना जाणीवही नसते.

गोल्डफिश

फोटो स्रोत, PA PHOTO/DAVID JONES

काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये यावर एक संशोधन झालं होतं. अभ्यास करणाऱ्या टीमनं 15 गोल्डफिशच्या हालचालींवर वर्षभर लक्ष ठेवलं. त्यानंतर संशोधकांच्या टीमला गोल्डफिशच्या प्रवास करण्याच्या क्षमतेबाबत नवी माहिती मिळाली.

''हे मासे तलाव, कालव्यांतून (जिथं त्यांच्या मालकांनी त्यांना सोडलं होतं) नदीच्या मार्गानं दलदलीच्या भागात पोहोचले होते. त्याठिकाणी त्यांनी अंडी दिली होती,'' असं संशोधनातून समोर आलं.

याचा अर्थ गोल्डफिश मासे एका वर्षात 230 किलोमीटर पेक्षाही जास्त लांबचा प्रवास करू शकतात.

गोल्डफिशपासून सुटका हवी आहे?

रिसर्च टीमला आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार गोल्डफिश सशाप्रमाणे पिलं जन्माला घालू शकतं. इतर माशांच्या अंडी देण्याचा हंगाम असतो, तर हे माले एकदा पिलांना जन्म दिल्यानंतर पुन्हा गर्भ धारण करू शकतात.

घरातील अॅक्वेरियममध्ये गोल्डफिश वेगानं मोठे होत नाहीत. पण बाहेर सोडल्यानंतर त्यांचा विकास झपाट्यानं होतो.

गोल्डफिश

पण इतरही काही अडचणी आहेत. तज्ज्ञांनी अॅक्वेरियमचं पाणी नद्या आणि तलावांमध्ये सोडण्याबाबतही इशारा दिला आहे. कारण त्यामुळं साचलेल्या पाण्यात निर्माण होणाऱ्या जल साठ्यांतील परजिवी प्रजातींना नुकसान होऊ शकतं.

पण मग तुम्हालाही गोल्डफिशपासून सुटका हवी आहे?

तर मग तज्ज्ञांच्या मते तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तुम्ही त्याला अशा जलसाठ्यात सोडा जिथं इतर जीवांना धोका निर्माण होणार नाही. किंवा दुसरा उपाय म्हणजे त्याला सरळ फ्रीजरमध्ये ठेवा."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)