दक्षिण आफ्रिका : जेकब झुमांच्या अटकेनंतर उसळलेल्या हिंसाचारात 72 ठार

जेकब झुमा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार उसळला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना गेल्या आठवड्यात तुरुंगवासात टाकण्यात आलं. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान 72 जणांचा मृत्यू झालाय.

यामध्ये सोमवारी (12 जुलै) रात्री दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी टाऊनशिप असणाऱ्या सोवेटोमधल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये लुटमार करताना झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्या 10 जणांचाही समावेश आहे.

गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या निदर्शनांनी शनिवार - रविवारी (10-11 जुलै) हिंसक वळण घेतलं. शॉपिंग मॉल पेटवून देण्यात आला आणि दुकांनांची नासधूस करण्यात आली.

दक्षिण आफ्रिका हिंसाचार

फोटो स्रोत, MARCO LONGARI/AFP via Getty Images

नासधूस करतानाचे आणि आग लावतानाचे व्हीडिओ दक्षिण आफ्रिकेतल्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकन सरकारने लष्कराची मदत घेतली आहे. सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत 800 लोकांना अटक केलीय.

90च्या दशकानंतरचा भीषण हिंसाचार

ही निदर्शनं म्हणजे 1990नंतरचा दक्षिण आफ्रिकेतला सर्वात भीषण हिंसाचार असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी म्हटलंय.

पेटवून देण्यात आलेली इमारत

फोटो स्रोत, EPA

लुटमार अशीच सुरू राहिली तर या दंगलग्रस्त भागांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याचं पोलिस विभागाचे मंत्री भेकी सेले यांनी पत्रकारांना सांगितलं.

पण क्वाजुलु-नतल आणि गॉतेंग प्रांतांमध्ये हिंसाचार होत असला तरी अद्याप आणीबाणी लावण्याइतपत परिस्थिती आली नसल्याचं संरक्षण मंत्री नोजिविवे पिसा काकुला यांनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

क्वाजुलु - नतल प्रांतांमध्ये हिंसाचारात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय, तर गॉतेंग प्रांतात 19 जण मारले गेले आहेत. यामध्ये मॉलमधल्या चेंगराचेंगरीत मारल्या गेलेल्या 10 जणांचाही समावेश आहे.

एकेकाळी नेल्सन मंडेलांचं शहर असणाऱ्या या भागातली अनेक दुकानं लुटण्यात आल्याचं बीबीसीच्या सहकारी वमनी खिजे यांनी सांगितलंय. रेस्टाँरंट्स, दारूची दुकानं आणि कपड्यांच्या दुकांनांचीही नासधूस करण्यात आली आहे.

आतापर्यंत 200पेक्षा शॉपिंग मॉल्स लुटण्यात आल्याचं ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने म्हटलंय.

आंदोलकांसमोर असहाय्य सुरक्षायंत्रणा

लष्कराने पोलिसांच्या सोबतीने काही दंगलखोरांना अटक केली. पण आंदोलकांच्या तुलनेत सुरक्षा यंत्रणांची संख्या अगदीच कमी आहे.

डरबनमधलं दृश्यं

फोटो स्रोत, RAJESH JANTILAL/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, डरबनमधलं दृश्यं

क्वाजुलु-नतालमध्ये आंदोलकांना अँम्ब्युलन्सवर हल्ला केल्याचं दक्षिण आफ्रिकेतल्या न्यूज वेबसाईट्सनी म्हटलंय.

तर झुमांच्या अटकेनंतर लोकांमध्ये तयार झालेल्या असंतोषाचा फायदा घेत काहींनी गुन्हेगारी कृत्यं केल्याचं काही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

बेरोजगारी आणि गरिबीमुळे जनतेत असलेला राग या हिंसाचारातून बाहेर पडत असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

झुमांना तुरुंगवास का झाला?

एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तुरुंगात जाण्याचा दक्षिण आफ्रिकेतला हा पहिला प्रसंग आहे.

भ्रष्टाचार प्रकरणाविषयीच्या एका तपासात सहभागी न झाल्याबद्दल झुमांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 7 जुलै रोजी झुमांनी पोलिसांसमोर समर्पण केलं.

आपल्या कार्यकाळादरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराविषयीच्या तपासात पुरावे देण्याची सूचना झुमांना देण्यात आली होती. पण या आदेशाचं पालन न केल्याने त्यांना 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

पण आपण एका राजकीय कटाचे बळी ठरल्याचं झुमांनी म्हटलंय.

2018मध्ये झुमांना आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC)कडून पदावरून हटवण्यात आलं, पण असं असलं तर पक्षात आणि त्यांच्या क्वाजुलु-नताल राज्यात त्यांचे भरपूर समर्थक आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)