G-7 Summit: जी-7 राष्ट्रं गरीब देशांना लशींच्या एक अब्ज डोसचा पुरवठा करणार

कोरोना, लस, जी7

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

जी-7 परिषदेत सहभागी देशांनी एकत्रित येत गरीब देशांना लशींचे एक अब्ज डोस पुरवू असा निर्धार केला आहे. थेट पद्धतीने किंवा कोव्हॅक्स शेअरिंग योजनेअंतर्गत लशीचा पुरवठा करण्यात येईल.

जगातील अधिकाअधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी हा पुढाकार असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं.

ब्रिटनमधल्या कॉर्नवॉल इथे ही परिषद सुरू आहे.

उत्तर आयर्लंडच्या मुद्यावरून वादंग

उत्तर आयर्लंडसंदर्भात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जी-7 राष्ट्रांच्या परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भडकले आहेत.

उत्तर आयर्लंड ब्रिटनचा भाग नसल्याचं मॅक्रॉन यांनी म्हटलं होतं. हे वक्तव्य अपमानजनक असल्याचं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्येच G7 राष्ट्रांची परिषद सुरू आहे. यादरम्यान मॅक्रॉन यांनी हे वक्तव्य केलं. यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भडकल्याचं वृत्त द टेलिग्राफ वृत्तपत्राने दिलं आहे.

युरोपीय संघाला अनेक वर्ष उत्तर आयर्लंड स्वतंत्र भाग आहे असं वाटत होतं.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मॅक्रॉन आणि जॉन्सन यांच्यात चर्चा झाली. मात्र मॅक्रॉन एका प्रदेशासंदर्भात बोलत होते. उत्तर आयर्लंड ब्रिटनचा भाग आहे की नाही यासंदर्भात बोलत नव्हते असं राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने सांगितलं.

ब्रेक्झिट प्रक्रियेनंतर उत्तर आयर्लंडसंदर्भात समस्या निर्माण झालेली असताना हा वाद निर्माण झाला आहे.

चीनचा जी-7 राष्ट्रांना इशारा- मूठभर देश जगाच्या भवितव्याचा निर्णय आता घेत नाहीत

जगाच्या भवितव्याचा निर्णय आता मूठभर देशांच्या हाती नसल्याचा इशारा चीनने जी-7 राष्ट्रांना दिला आहे. लंडनमध्ये चीनच्या दूतावास प्रवक्त्याने म्हटलं आहे की, "कोणताही देश मोठा असो की छोटा, मजबूत असो किंवा कमकुवत, श्रीमंत असो वा गरीब सगळे देश समान आहेत यावर आमचा विश्वास आहे. जागतिक महत्त्वाच्या विषयांवर सगळ्या देशांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावेत."

कोरोना, लस, जी7

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्षि जिनपिंग

चीनतर्फे हे वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा जी-7 परिषदेतील देश आमची एकजूट आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत.

जी-7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश होतो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)