जेरूसलेमच्या अल-अक्सा मशीद परिसरात पुन्हा हिंसाचार, शेकडो जखमी

जेरुसलेममध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली पोलिसांमध्ये सलग दुसऱ्या रात्री चकमक झाली असून अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळात आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि जुन्या शहरातील दमास्कस गेटला आग लावली. अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देत स्टन ग्रेनेड आणि वॉटर कॅनन डागले. यात किमान 80 पॅलेस्टिनी जखमी झाले असून 14 जणांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे अशी माहिती पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटने दिली. एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याचंही इस्त्रालयी पोलिसांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे.

शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात 200 पॅलेस्टिनी आणि 17 इस्रायली पोलीस जखमी झाले होते.

यामध्ये 163 पॅलेस्टिनी आणि इस्रायलचे 6 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पॅलेस्टिनी वैद्यकीय सेवा आणि इस्रायलच्या पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे.

हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांसाठी रेड क्रिसेंट संस्थेने एका तात्पुरतं रुग्णालय उभारलं आहे.

अल-अक्सा मशीद जुन्या जेरुसलेम शहरात आहे. ही मशिद मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. पण याच ठिकाणी टेंपल माऊंट हे ज्यू धर्मीयांचं पवित्र स्थळसुद्धा आहे.

दोन्ही समुदायांतल्या वादामुळे या परिसरात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात.

नमाजानंतर हिंसाचार

7 मे रोजी रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिक जमा झाले होते.

इस्रायल पोलिसांचा दावा आहे, की नमाजनंतर इथे हिंसाचाराला सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

त्यानंतर अक्सा मशिदीतील विश्वस्तांनी मशिदीच्या स्पीकरवरून शांतता राखण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी स्टन ग्रेनेडचा वापर थांबवावा. तरूणांनी संयम बाळगावा आणि शांतता राखावी, असं आवाहन मशिदीतून करण्यात येत होतं.

गोळीबारात जखमी झालेल्या 88 पॅलेस्टिनी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती रेड क्रिसेंट इमर्जन्सी सर्व्हीसने दिली आहे. तसंच यावेळी 6 पोलीस जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनांनीही या परिसरातील तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

येथील वाढत्या तणावामुळे आपण चिंताग्रस्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने एका प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे.

मध्य-पूर्वेत संयुक्त राष्ट्रांचे विशेष समन्वयक म्हणून काम पाहणारे टॉर वेनेस्लँड यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी जुन्या जेरुसलेममधील जैसे थे स्थितीचा सर्वांनीच सन्मान करावा, असं वेनेस्लँड म्हणाले. तसंच इस्रायलने तिथून कोणालाही हटवू नये. आंदोलनकर्त्यांविरोधात बळाचा वापर करताना त्यांनी संयम बाळगावा, असंही वेनेस्लँड यांनी म्हटलं.

इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे. पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.

इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)