कोरोना विषाणूच्या संरचनेत बदल होत आहे का?

कोरोना व्हायरस, आरोग्य, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरस
    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

कोरोना संदर्भात बातमी करताना मी एक गोष्ट ध्यानात घेतो. कोरोना विषाणूचं वर्तन बदललं आहे का?

अनेकदा हा बदल अर्थहीन असतो तर काही वेळेस विषाणू स्वत:मध्ये असा काही बदल करतो की त्याचं स्वरूप आणखी विनाशकारी होतं. त्यातून आपल्याला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

त्याची त्रास देण्याची क्षमता म्हणजे आपल्याला बाधित करण्याची क्षमता वाढणं हे विषाणूसाठी विजयी होण्यासारखं आहे.

कोरोना विषाणूचा एक आणखी प्रकार विकसित झाला आहे का? याचे काही ठोस पुरावे नाहीत. आग्नेय इंग्लंडमध्ये अशी शक्यता वर्तवली गेली आहे. माणसांना आणखी सहजतेने तो संक्रमित करू शकतो. नव्याने विकसित झालेला कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात शिरल्यास आणखी गंभीर लक्षणं दिसतात. या विषाणूच्या ताकदीपुढे लसही प्रभावहीन ठरू शकते.

शास्त्रज्ञांचं दोन गोष्टींकडे काटेकोर लक्ष आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी कोरोना विषाणूची पातळी वाढते आहे.

हा धोक्याचा इशारा आहे मात्र याचे दोन अर्थ असू शकतात. विषाणूची अंतर्गत संरचना बदलली आहे जेणेकरून कमीत कमी वेळात माणूस संक्रमित होईल.

विषाणू योग्य वेळी योग्य व्यक्तींच्या शरीरात गेला तर त्याचा मुक्त संचार सुरू होतो. उन्हाळ्यात सुट्टीवर असताना लोकांना त्याची लागण झाली. घरी परतताना ते संक्रमित झाले. याला स्पॅनिश स्ट्रेन म्हटलं गेलं.

कोरोना व्हायरस, आरोग्य, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, कोरोना लस

प्रयोगशाळेतल्या प्रयोगांनंतर हे स्पष्ट होऊ शकेल की कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार मूळ विषाणूइतकाच घातक आहे का त्यापेक्षा अधिक संसर्ग घडवू शकतो.

विषाणूची संरचना कशी बदलली हे वैज्ञानिकांनाही कोड्यात टाकणारं आहे.

"कोरोना विषाणूत सातत्याने बदल होत आहेत. आम्ही अपेक्षा केली होती त्यापेक्षाही बरेच जास्त. काही बदल अनोखे आहेत," असं युकेतील कोव्हिड19 जिनोमॅक्स प्राध्यापक निक लोमन यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूच्या परिवर्तनाचे दोन प्रकार आहेत. त्यांच्या अगम्य नावांकरता क्षमस्व.

विषाणूंमध्ये दोन प्रकारे जनुकीय बदल होतात. त्यांच्या अवघड नावांमुळे मी तुमची माफीच मागायला हवी. हे दोन्ही जनुकीय बदल कोरोना विषाणूवरच्या वर आलेल्या म्हणजेच स्पाईक्समधल्या प्रथिनांमध्ये आढळतात.

याच्या सहाय्याने हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो आणि मानवी पेशींवर ताबा मिळवतो. हा जनुकीय बदल N 501 (मी तुम्हाला या नावाबद्दल आधीच सांगितलं होतं) यामुळे कोरोनाच्या स्पाईक्सच्या महत्त्वाच्या भागात बदल होतो. याला रिसेप्ट बाईडींग डोमेन म्हणतात.

इथे पहिल्यांदा आपल्या शरीराच्या पेशींच्या पृष्ठभागावर सगळ्यात आधी संपर्क येतो.

हा संरचना बदल महत्त्वाचा आहे असं प्राध्यापक लोमन यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरस, आरोग्य, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लस

अन्य संरचना H69/V70 deletion याआधीही अनेकदा निर्माण झालं आहे. नव्या संरचनेच्या कोरोना विषाणूचं आक्रमण रोखण्यात शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज कमी पडल्या.

कोरोना विषाणूचं बदललेलं रूप नेमकं कसं आहे हे समजून घेण्यासाठी प्रयोगशाळेत शास्त्रोक्त अभ्यास सुरू आहे.

"कोरोना विषाणूची संरचना बदलली आहे, तो विषाणू विकसित झाला आहे हे आम्हाला कळलं आहे मात्र जीवशास्त्रीयदृष्ट्या नेमकं काय बदललं आहे याची आम्हाला कल्पना आलेली नाही," असं बर्मिंगहॅम विद्यापीठातील प्राध्यापक अलन मॅकनली यांनी सांगितलं.

"याचा किती गंभीर परिणाम होईल किंवा होणार नाही हे आताच सांगणं काहीसं घाईचं ठरेल," असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे लशीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न निर्माण झाले. फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड या कंपन्यांच्या लशी कोरोनाच्या स्पाईक्सविरोधात लढण्यासाठी सक्षम बनवण्यात आल्या आहेत.

मात्र आपलं शरीर विविध स्वरुपाची आक्रमणं कशी परतावून लावण्यात वाकबगार आहे. त्यामुळे लस या सुधारित स्वरूपाच्या कोरोना विषाणूचा सामना करू शकेल असा विश्वास आरोग्य तज्ज्ञांना वाटतो आहे.

वर्षभरापूर्वी प्राण्यांमध्ये आढळलेले हे विषाणू माणसाच्या शरीरात संक्रमित झाले. तेव्हापासून साधारण महिन्याभरात या विषाणूच्या संरचनेत दोन बदल झाले असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे.

सध्याच्या कोरोना विषाणूचा एक नमुना घ्या आणि वुहानमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोना विषाणूच्या स्वरूपाशी या नव्याची तुलना करा. त्या दोघांमध्ये किमान 25 बदल झाल्याचं तुम्हाला आढळेल.

कोरोना विषाणू माणसांवर आक्रमण करण्यासाठी विविध पर्याय आजमावतो आहे.

आपण याआधीही अशी उदाहरणं पाहिली आहेत. कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार म्हणजे G614, ज्याची माणसांना संक्रमित करण्याची ताकद वाढती आहे.

विषाणू अशा पद्धतीने उत्क्रांत होत गेला तर आपल्याला लशींचं नूतनीकरण करायला लागेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)