शरद पवारांच्या पावसातल्या सभेची तुलना जो बायडन यांच्या 'या' सभेशी का होतेय?

जो बायडन, शरद पवार

फोटो स्रोत, @JoeBiden/BBC

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या 'मैदानात खेळाडूच दिसत नाही,' या वक्तव्याची बरीच चर्चा होती. त्याचवेळी 18 ऑक्टोबरला साताऱ्यात भर पावसात एक सभा झाली आणि या सभेनं निवडणुकीच्या मैदानाची गणितंच बदलली. या पावसातल्या सभेचे वक्ते होते शरद पवार.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कधीही चर्च निघाली की, शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची आठवण काढली जातेच. त्या सभेतील पावसात भिजत भाषण करतानाच्या शरद पवारांच्या दृश्यानं महाराष्ट्रातील सोशल मीडिया दाणाणून सोडला. माध्यमांनी हे दृश्य दाखवलं.

निवडणुकीत 'नेरेटिव्ह' तयार करण्याला आणि बदलण्याला मोठं महत्त्व दिलं जातं. या सभेनं तेच केल्याचं आजही राजकीय वर्तुळातील जाणकार सांगतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

शरद पवार यांच्या या सभेची आठवण निघण्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील निवडणूक आणि तेथील ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांची भर पावसातली सभा.

अमेरिकेच्या दक्षिण-पूर्व भागातील फ्लोरिडा राज्यात जो बायडन यांची ही सभा झाली. सभा सुरू असतानाच पाऊस आला आणि भर पावसातच जो बायडन हे भाषण करत राहिले.

जो बायडन पावसातल्या सभेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटो ट्वीट करताना बायडन यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'This storm will pass, and a new day will come.' म्हणजेच, 'हे वादळ निघून जाईल, आणि एक नवीन दिवस उजाडेल.'

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अर्थात, पावसाचा जोर वाढल्यानंतर जो बायडन यांना सभा आटोपती घ्यावी लागली खरी, पण सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

जो बायडन यांनी फोटो ट्वीट केल्यानंतर तर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचाही 'पाऊस' पडला. अमेरिकेत तर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेतच, मात्र बऱ्याच भारतीयांनीही आणि त्यातही विशेषत: महाराष्ट्रातील लोकांनी हा फोटो शेअर करत त्याची तुलना शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेशी केली आहे.

शरद पवार

याला जोड मिळालीय शरद पवार आणि जो बायडन यांच्या वयाचीही. दोघांच्या वयातही एक-दोन वर्षांनी फरक आहे. म्हणजे शरद पवार आता 79 वर्षांचे तर बायडन हे 77 वर्षांचे आहेत.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या फोटोंची तुलना करणं इथवर ठीक होतं, पण आता शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करून तुलना केलीय.

रोहित पवार म्हणालेत, "जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो, पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही, तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल."

2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अर्थात, इथे एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे, शरद पवार यांची सभा सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठी होती. विधानसभा निवडणुकीवेळीच ही पोटनिवडणूक होती आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार होते शरद पवार यांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील.

साताऱ्यात लोकप्रिय असलेले उदयनराजे भोसले यांचा पराभव या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी केला होता आणि पाटलांच्या या विजयात पवारांच्या सभेचा मोठा वाटा असल्याचं स्वत: श्रीनिवास पाटलांनाही पुढे म्हटलं होतं.

आता जो बायडन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रंप यांचं बायडन यांच्यासमोर आव्हन आहे. अमेरिकेचा कौल कुणाकडे जाणार, हे ठरण्याचा दिवस तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना जो बायडन यांच्या पावसातील सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

डोनाल्ड ट्रंप, जो बायडन
फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप, जो बायडन

अमेरिकेची निवडणुकीत कोण किती पुढे आहे, हेही आपण पाहूया.

राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये जो बायडन आघाडीवर

एखादा उमेदवार हा देश पातळीवर किती लोकप्रिय आहे हे नॅशनल पोल (National Poll) म्हणजेच राष्ट्रीय पाहणी वा सर्वेक्षणावरून समजतं. पण म्हणून हा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरत नाही.

उदाहरणार्थ- 2016 मध्ये या राष्ट्रीय पाहण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवर होत्या. डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा 30 लाख मतं जास्त मिळवत त्या या पाहणीत जिंकल्या होत्या. पण तरीही प्रत्यक्ष निवडणुकीत त्या पराभूत झाल्या.

कारण अमेरिकेमध्ये 'इलेक्टोरल कॉलेज' पद्धत वापरली जाते. म्हणूनच जास्ती मतं मिळाली म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकला असा याचा अर्थ होत नाही.

डोनाल्ड ट्रंप, जो बायडन

फोटो स्रोत, JIM WATSON,SAUL LOEB/AFP VIA GETTY

ही बाब बाजूला ठेवली तर या राष्ट्रीय पाहण्यांमध्ये जो बायडन हे वर्षातला बहुतेक काळ डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा पुढे आहेत. गेले काही आठवडे ते 50% च्या आसपास आहेत आणि अनेकदा त्यांनी 10 पॉइंट्सची आघाडी घेतलेली आहे.

याउलट, 2016 मध्ये पाहण्यांचे निकाल इतके स्पष्ट नव्हते. ट्रंप आणि त्यांच्या तेव्हाच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये काहीच टक्क्यांचा फरक होता आणि निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत गेला, तसं हे अंतर मोजक्या टक्क्यांवर आलं होतं.

निवडणुकीत कोणत्या राज्यांची भूमिका निर्णायक?

आपल्याला किती मतं मिळतात यापेक्षा ती मतं कुठून मिळतात याला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जास्त महत्त्वं असल्याचं हिलरी क्लिंटन यांच्या पराभवावरून लक्षात आलं.

बहुतेक राज्यांमधून नेहमीच एका ठराविक पद्धतीने मतदान होतं. म्हणजे प्रत्यक्षात मोजकीच काही राज्यं उरतात जिथे दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असते आणि दोघांनाही तिथून जिंकायची संधी असते.

या राज्यांना 'बॅटलग्राऊंड स्टेट्स' (Battleground States) म्हणजेच चुरशीची लढत असणारी राज्यं म्हटलं जातं. निवडणुकीतला जय वा पराजय इथेच ठरतो.

'इलेक्टोरल कॉलेज' सिस्टीम काय आहे?

राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या इलेक्टोरल कॉलेज सिस्टीममध्ये प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार मतांचा एक ठराविक आकडा म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज व्होट दिला जातो.

डोनाल्ड ट्रंप, जो बायडन

फोटो स्रोत, AFP

संपूर्ण देशात मिळून अशी एकूण 538 इलेक्टोरल कॉलेज व्होट्स आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान 270 इलेक्टोरल कॉलेज व्होट्स जिंकावी लागतात.

या वरच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे चुरशीची लढत असणाऱ्या काही बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये इतरांपेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज व्होट्स आहेत. म्हणूनच अनेकदा उमेदवार या राज्यांमध्ये प्रचार करण्यावर भर देतात.

बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये कोण आघाडीवर?

सध्याच्या घडीला या राज्यांमधल्या पाहण्यांमध्ये जो बायडन यांच्याबाजूने कल दिसतोय. पण अजूनही बराच मोठा टप्पा बाकी आहे आणि गोष्टी झपाट्याने बदलू शकतात. डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत तर हे झपाट्याने घडतं.

डोनाल्ड ट्रंप, जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

मिशिगन, पेन्सेल्व्हानिया आणि विस्कॉन्सिन या तीन औद्योगिक राज्यांमध्ये सध्या बायडन यांच्याकडे मोठी आघाडी असल्याचं जनमत चाचण्यांमध्ये दिसतंय. 2016मध्ये ट्रंप यांनी या राज्यांमध्ये 1 टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकत निवडणुकीत विजय मिळवला होता.

पण ज्या चुरशीच्या राज्यांमध्ये ट्रंप यांनी 2016मध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला होता, त्या राज्यांची चिंता सध्या ट्रंप यांच्या कॅम्पेनला असेल. आयोवा, ओहायो आणि टेक्सास या तीन राज्यांमधून ट्रंप 8 ते 10 टक्क्यांच्या फरकाने तेव्हा जिंकले होते. पण आता मात्र त्यांची पकड केवळ टेक्सासवरच राहिल्याचं पाहण्यांमधून दिसतंय.

यामुळेच ही निवडणूक ट्रंप जिंकण्याची शक्यता कमी असल्याचं काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय. FiveThirtyEight या राजकीय विश्लेषण करणाऱ्या वेबसाईटनुसार ही निवडणूक जिंकण्यासाठीची 'पसंती' बायडन यांना आहे. तर बायडन डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव करण्याची शक्यता असल्याचं द इकॉनॉमिस्ट ने म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.