आंतरराष्ट्रीय मांजर दिनः बोका रिटायर होतो तेव्हा...

फोटो स्रोत, PA Media
बोका रिटायर होतोय… हे वाचून तुम्हाला काहीसं आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. शिवाय, हा बोका काही साधासुधा नव्हे, तर इंग्लंडच्या परराष्ट्र विभागाच्या कार्यालयातील प्रसिद्ध बोका होता.
'पामर्स्टन' नामक या बोक्याची 'चीफ माऊसर' अशी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्याचं स्वत:चं ट्विटर हँडलही आहे आणि त्याला एक लाखाहून अधिक लोक फॉलोही करतात. पामर्स्टनचे सर्व अपडेट त्यावरून शेअर केले जातात.
बॅटरसी येथून 2016 साली पामर्स्टनला परराष्ट्र विभागाच्या कार्यालयात आणलं होतं.

फोटो स्रोत, @DiploMog
बरं या बोक्याचं नाव 'पामर्स्टन' ठेवण्यामागेही विशेष कारण आहे. 19 व्या शतकातील ब्रिटनचे परराष्ट्र सचिव आणि माजी पंतप्रधान व्हिसकाऊंट पामर्स्टन यांच्या नावावरून या बोक्याचं नामकरण करण्यात आलं होतं.
या बोक्याचे जगातील अनेक दिग्गजांसोबत फोटो आहेत. म्हणजे, इंग्लंडच्या परराष्ट्र विभागाच्या कार्यालयात जे कुणी भेटील येत, त्यांच्यासोबत काढलेल्या बऱ्याच फोटोंमध्ये पामर्स्टन दिसतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
असो… तर आता हा बोका परराष्ट्र विभागाच्या कार्यालयातून रिटायर होतोय.
काळ्या रंगाचा आणि चारही पायांवर पांढरे ठिपके, मानेखाली पांढरा रंग असा दिसणारा पामर्स्टन रिटायर होणार म्हटल्यावर अनेकजण भावुकही झाले आहेत. पामर्स्टनच्या ट्विटर हँडलवर नजर टाकल्यास लोकांच्या भावूक प्रतिक्रिया वाचायला मिळतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
परराष्ट्र विभागासारख्या कायमच बड्या अधिकाऱ्यांची ये-जा असणाऱ्या कार्यालयात सुमारे चार वर्षांचा कालावधी घालवल्यानंतर पामर्स्टननं निवृत्ती घेतलीय आणि तो आता या सगळ्यापासून दूर शांततेत जगण्यास जाणार आहे. तसं त्यानं पत्र लिहिलंय आणि ते ट्विटरवरही आहे.
हे पत्र इंग्लंडच्या परराष्ट्र विभागाचे कायमस्वरूपी सचिव सर सायमन मॅकडोनल्ड यांना उद्देशून लिहिलं आहे.
पामर्स्टनचं पत्रही फार गंमतीशीर आहे. आता इथून दूर जात असल्यानं किग चार्ल्स स्ट्रीटवरील उंदरांना मी पकडू शकणार नाही, याबद्दल खंतही त्यानं त्यात व्यक्त केलीय.
युकेसाठी आपण कायमच सदिच्छादूत असू, असंही या पत्रात म्हटलंय.

फोटो स्रोत, UK government
हा बोका आता शहराबाहेरील नव्या घरात गेलाय. त्याबद्दलही रंजक पद्धतीनं या पत्रात सांगितलंय. परराष्ट्र विभागातील परदेशी मान्यवरांच्या संवादापेक्षा आता मी झाडांवरून उड्या मारतोय, असं म्हटलंय.
पामर्स्टनच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केलेल्या पत्रात कोरोनाच्या संदर्भानंही लिहिलंय. "इतर सर्व कर्मचाऱ्यांसारखंच मीही आता वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतलाय. ऑफिसऐजी घरून काम करेन आणि तेही तितक्याच मेहनतीनं," असं पत्रात म्हटलंय.
पामर्स्टन आता नेमका कुठे राहील, हे उघड करण्यात आले नाही. शिवाय, इकडे परराष्ट्र विभागात पामर्स्टननंतर कुठल्या बोक्याची नेमणूक होते, हे अजून स्पष्ट नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)