चीनमधल्या मशिदी जमीनदोस्त: मुस्लीम बेपत्ता कसे झाले? मशिदी गायब कशा झाल्या?
चीनच्या पश्चिमेकडील शिंजिअॅंग प्रांतात गेल्या काही वर्षांमध्ये मशिदी आणि धार्मिक स्थळं जमीनदोस्त करण्यात आली. पूर्वी सॅटेलाईट नकाशात दिसणारी मुस्लिम समाजाची धार्मिक स्थळं हळूहळू नष्ट होताना दिसतायत.
मुस्लीम आणि त्यांच्या श्रद्धांचं दमन करण्याचे पुरावे चीनमध्ये दिवसेंदिवस पुढे येतायत.
बीबीसीच्या टीमला चीनमधल्या काही धार्मिक स्थळं आणि धर्मगुरूंची भेट घेता आली. धार्मिक स्वातंत्र्यावर बंधनं आणली जातायत हा आरोप मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी फेटाळलाय.
चीनमधल्या मशिदी गायब कशा झाल्या, याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा स्पेशल रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)