You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: सेक्सवर्कर का करत आहेत रेनकोटचा वापर?
लॅटिन अमेरिकेतला बोलिव्हिया हा एक देश. या देशातील देहविक्रय अर्थात सेक्सवर्कर्सनी कामाला सुरुवात केली आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्लोव्ह्ज, ब्लिच आणि पारदर्शक रेनकोट वापरायला सुरुवात केली आहे.
सेक्सवर्करसाठी काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ नाईट वर्कर्स ऑफ बोलिव्हिया (ओटीएन-बी) या स्वयंसेवी संस्थेच्या सूचनेनुसार या महिलांनी स्वत:च्या आरोग्यासाठी ही काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
बोलिव्हियात देहविक्रय व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. मात्र केवळ परवानाप्राप्त वेश्यागृहच सुरू झाली आहेत. मात्र त्यांनाही नियमांचं काटेकोर पालन करणं अनिवार्य आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बोलिव्हियातही मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
मात्र तरीही देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी नियम कठोर आहेत. रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आलेला असतो.
वेनेसा या ठिकाणी काम करतात. त्यांना दोन मुलं आहेत. दोन मुलांच्या शिक्षणासाठी काम करणं आवश्यक असल्याचं त्या सांगतात.
आमचे ग्राहक सुरक्षेच्या मुद्यांची काळजी घेतात. आम्ही जी काळजी घेत आहोत ती केवळ आमच्या नव्हे त्यांच्याही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे असं वेनेसा सांगतात.
वेनेसा यांच्याप्रमाणे एनटोनिएटा याही इथेच काम करतात. पेपर फेस मास्क, प्लास्टिकचा पडदा, ग्लोव्ह्ज आणि रेनकोट यांचा वापर करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
वेश्यागृहात ग्राहकांसमोर नृत्य करताना सॅनिटायझेशनसाठी खांबांवर ब्लिच फवारतात.
बायो-सुरक्षित सूटमुळे आम्ही आमचं काम करू शकतो आणि सुरक्षितही राहू शकतो असं त्यांनी सांगितलं.
ओटीएन बी संस्थेच्या लोकांनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. वेश्या व्यवसायात कार्यरत महिलांचं आरोग्य नीट राहण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याची 30 पानी पुस्तिका मंत्रालयाकडे सुपुर्द केली होती.
बोलिव्हियात आतापर्यंत 50 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत बोलिव्हियात 1900 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्याच आठवड्यात बोलिव्हियाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष जीनिन आनेन शावेज यांनी ट्वीट करून सांगितलं की, त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
बोलिव्हियात कोरोना चाचणी कमी होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॅटिन अमेरिकेतील सगळ्यात गरीब देशांमध्ये बोलिव्हियाचा समावेश होतो. 10 लाखांमागे सगळ्यात कमी कोरोना चाचण्या बोलिव्हियात होत आहेत.
मात्र शेजारच्या ब्राझीलशी बोलिव्हियाची तुलना केली जाऊ शकत नाही. जगातील सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेल्या देशांमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये 20 लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि 75 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
बोलिव्हियातील सेक्सवर्कर्सची संघटना आहे. सगळ्यांसाठी हा अत्यंत कालखंड आहे. महिलांवर बंदी घालण्यात आल्याने त्यांना संसर्गाचा धोका वाढला आहे.
आम्हीही बोलिव्हियाच्या समाजाचा भाग आहोत. आम्ही सेक्सवर्कर्स आहोत. महिला आहोत, कुणाची तरी आत्या, काकू आहोत. आम्हालाही आमच्या कामाची काळजी वाटते. दुर्देवाने आम्हाला कामासाठी घराबाहेर पडावं लागेल आणि त्याचे परिणाम वाईट असतील असं या संघटनेच्या लिली कोर्ट्स म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)