'पहिला ब्लॅक आफ्रिकन अंतराळवीर' होण्यापूर्वीच 'अॅफ्रोनॉट' मॅसेको दुचाकी अपघातात मृत्युमुखी

मांडला मॅसेको

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, मांडला मॅसेको हे 'टाऊनशिप बॉय फ्रॉम प्रिटोरिया' अशी स्वत:ची ओळख करून द्यायचे.

2013 साली अमेरिकेतील अंतराळ अकादमीत मांडला मॅसेको यांची 10 लाख जणांमधून निवड झाली होती. अवकाशात झेपावणारा पहिला कृष्णवर्णीय अर्थात ब्लॅक आफ्रिकन म्हणून मान त्यांना मिळणार होता. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

दक्षिण आफ्रिकेतील 30 वर्षीय अंतराळवीर मांडला मॅसेको यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदनाद्वारे दिली.

मॅसेको हे दक्षिण आफ्रिकेतील वायुदलाचे सदस्य होते. 'अॅफ्रोनॉट' आणि 'स्पेसबॉय' या टोपणनावांनी ते ओळखलं जायचे. मात्र मॅसेको हे 'टाऊनशिप बॉय फ्रॉम प्रिटोरिया' अशी स्वत:ची ओळख करून द्यायचे. प्रिटोरिया हे दक्षिण आफ्रिकेतील शहर आहे.

मॅसेको यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी मॅसेको यांच्या टोपणनावांचा आवर्जून उल्लेख केला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मॅसेको यांनी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये आठवडाभर उप-कक्षीय उड्डाणासाठी तयारी केली होती. हे 2015 साली अवकाशात झेप घेणार होतं.

मांडला मॅसेको

फोटो स्रोत, Twitter

मेसॅको म्हणायचे, "मला असं काहीतरी करायचं आहे, ज्यामुळे आफ्रिकेतील तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल आणि आपण कुठल्याही पार्श्वभूमीतून असलो, तरी आपण कोणतीही गोष्ट साध्य करु शकतो, हे मला दाखवून द्यायचं होतं."

आपण अंतराळातून फोन करणार असल्याचे त्यांनी बीबीसीला सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "मला आशा आहे की नील आर्मस्ट्राँग यांच्यासारखेच माझेसुद्धा काही उद्गार असावेत जे ऐतिहासिक ठरतील."

अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होते. 2012 साली वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालं. "हे चंद्रावरील मानवाचं पहिलं पाऊल आहे, पण मानवजातीसाठी ही फार मोठी झेप आहे," असं नील आर्मस्ट्राँग त्यांच्या चांद्रमोहिमेवेळी म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)