You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया प्लेन अपघात: कधी विमानावर वीज पडल्यामुळे विमानात बिघाड होऊ शकतो का?
काल एका रशियन विमानाने मॉस्को विमानतळावर इमरजन्सी लँडिंग केल्यावर पेट घेतला. या दुर्घटनेत 41 लोकांचा मृत्यू झाला.
हे विमान एक सुखोई सुपरजेट-100 होतं. मॉस्कोच्या शेरेमेत्येवो विमानतळावरून या विमानाने संध्याकाळी 6.02 मिनिटांनी मरमांस्कच्या दिशेने उडालं. या विमानाने यशस्वी टेकऑफ केलं खरं, मात्र वैमानिकांनी काही वेळाने तांत्रिक बिघाड झाल्याचा इशारा देत आपत्कालीन लँडिंग करण्याचं ठरवलं. धावपट्टीवर उतरताच विमानाच्या इंजिनने पेट घेतला.
मात्र विमानावर वीज पडल्यामुळे विमानाला इमरजन्सी लँडिग करावं लागल्याची माहिती आता समोर येत आहे. विमान कर्मचारी आणि प्रवाशांनी ही माहिती दिली आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिलेला नाही.
आधुनिक विमानावर वीज पडली तर त्याचं नुकसान होत नाही. रशियाच्या उड्डयण विभागाने तांत्रिक कारणामुळे इमरजन्सी लँडिग करावं लागल्याची माहिती दिली आहे.
या विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांकडे तो देण्यात आला आहे.
विमान कर्मचारी आणि प्रवासी काय म्हणतात?
या विमानाचा वैमानिक डेनिस येवडिकोमव यांनी रशियाच्या प्रसारमाध्यमांना सांगितलं की वीज पडल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाबरोबरचा संपर्क तुटला आणि त्यामुळे वैमानिकाला इमरजन्सी लँडिग करावं लागलं.
प्योटर येग्रोव या विमान अपघातातून बचावले आहेत. ते म्हणाले, "विमानाने झेप घेतली आणि विमानावर वीज पडली. हेलकावे घेत विमान लँड झालं. मी तर भीतीनेच मेलो होतो. "
एका प्रत्यक्षदर्क्षीच्या मते त्याने अक्षरश: नाकतोड्यासारखी उडी मारली. (नाकतोडा फक्त समोरच्या दिशेला उडी मारू शकतो.)
वीज पडल्यामुळे विमान पेट घेतं का?
रोज आकाशात लाखो विमानं उड्डाणं घेतात. त्यांच्यावर वीज पडणं ही अतिशय सामान्य बाब आहे.
पारंपरिकरीत्या विमानाच्या बांधणीसाठी अल्युमिनिअमचा वापर करतात. त्यामुळे वीज पडली तरी विमानाचं नुकसान होत नाही. विमानाचा वरचा थर हा एखाद्या सुरक्षित कवच असल्यासारखं काम करतो. त्यामुळे प्रवास सुरक्षितपणे प्रवास होतो.
आता जी नवीन विमानं बनत आहेत, ती कार्बन फायबरसारख्या हलक्या मटेरिअलपासून तयार होतात. या मटेरिअलमधील विजेची सुवाहकता तुलनेने कमी असते, पण कार्बन फायबरला अनेकदा धातूच्या जाळीचा किंवा फॉईलचा आधार लागतो.
तसंच विमानात असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं तसंच इंधनाच्या टाकीचं कुठल्याही तारांपासून रक्षण केलं जातं. यामुळे वीज पडली तरी धोका निर्माण होत नाही.
पण वीज पडल्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड होऊ शकतात. त्यामुळे विमानाला मार्ग बदलावा लागू शकतो किंवा इमरजन्सी लँडिग करावं लागतं. मात्र विमान कोसळण्याच्या दुर्घटना अगदी दुर्मिळ आहेत.
वीज पडल्याची घटना प्रवाशांच्या लगेच लक्षात येऊ शकते. त्यांना मोठा आवाज ऐकू येतो किंवा विमानातल्या आतल्या भागात प्रकाश पडतो.
2012 मध्ये इंडोनेशियात सुखोई सुपरजेट-100 या विमानाचा अशा प्रकारे अपघात झाला होता. हे विमान एका पर्वताला धडकल्यामुळे 45 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामागे मानवी चूक असल्याचा दावा करण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)