You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार पेट्रो यांनी पोडियमशी वाद का घातला?
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार पेट्रो पोरोशेन्को यांनी रिकाम्या मंचाशीच वादविवाद केला. कारण काय तर त्यांचे प्रतिस्पर्धी वोल्डोमोर झेलेन्स्की तिथे आलेच नाही. झेलेन्स्की हे अभिनेते आणि कॉमेडियन म्हणून ओळखले जातात.
राजधानी कीवच्या ऑलिम्पिक स्टेडिअममध्ये शेवटी त्यांनी हजारो प्रेक्षकांशी एकट्यानेच संवाद साधला.
गेल्या आठवड्यात दोन्ही स्पर्धकांनी संवाद साधायचं ठरवलं पण तारीख मात्र ठरवली नाही.
झेलेन्स्की यांनी गेल्या शुक्रवारी येण्याचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक होण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी एकमेकांसमोर येण्याचं आश्वासन दिलं होतं.
पोरोशेन्को यांना पहिल्या टप्प्यात फक्त 16% मतं मिळाली आहेत. आता ते झेलेन्स्की यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्याचं भांडवल करण्याच्या तयारीत आहेत.
बीबीसी प्रतिनिधी जोनाह फिशर यांच्या मते पोरोशेन्को यांचे प्रतिस्पर्धी झेलेन्स्की यांना कोणतीच राजकीय दृरदृष्टी नाही हे जगासमोर आणायचं होतं. त्यामुळे त्यांनी ही चर्चा आयोजित केली होती.
मात्र ते आले नाहीत त्यामुळे या 45 मिनिटांत पोरोशेन्को यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली आणि त्यांच्या अनुपस्थित स्पर्धकावर टीका केली.
पोरोशेन्को यांच्या विरोधकांच्या मते त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी काहीही केलं नाही. त्यांनी निवडणुकीला एक मूक चित्रपटाचं रुप दिलं आहे आणि झेलेन्स्की घाबरट असल्याचा आरोप केला.
"जर ते लोकांपासून आणखी घाबरले तर आम्ही त्यांना पुन्हा आमंत्रित करू. कोणाला निवडून द्यायचं हे ठरवण्यासाठी आम्ही त्यांना रोज बोलावू." असं त्यांनी जमावाला उद्देशून बोलताना म्हणाले.
झेलेन्स्की यांनी पारंपारिक प्रचाराच्या पद्धतीला फाटा दिला आहे. त्यांनी कोणत्याही सभा घेतल्या नाही किंवा मुलाखती दिल्या नाही. ते फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करत आहेत.
त्यांचा राजकीय दृष्टिकोन काय आहे हे सांगणं सध्या कठीण आहे. फक्त त्यांना काहीतरी नवीन आणि वेगळं करायचं आहे.
असं असलं तरी झेलेन्स्की यांनी पहिली फेरी सहजपणे जिंकली. त्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली. पुढच्या आठवड्यात मतदान होणार आहे आणि सध्या तरी सामना त्यांच्या बाजूने झुकला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)