Facebook Down : तुमचंसुद्धा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप बंद पडलंय का?

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांना बुधवारी रात्रीपासून प्रॉब्लम येत आहे.
फेसबुकच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी घटना घडली आहे. याआधी 2008मध्ये फेसबुक वापरण्यास अडचणी आल्या होत्या. त्यावेळी फेसबुकचे 150 दशलक्ष युजर्स होते. आता ही संख्या 2.3 अब्ज आहे.
अजूनही फेसबुक जैसे थे असंच आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप व्यवस्थित चालावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं फेसबुक एक ट्वीट करून सांगितलं आहे.
"फेसबुक फॅमिलीतले काही अॅप्लिकेशन्स काही लोकांना वापरण्यास अडचणी येत आहेत. लवकरच ही समस्या सोडवली जाईल," असं फेसबुकच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या मागचं कारण मात्र फेसबुकने दिलं नाही. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा मालकी हक्क फेसबुककडं आहे.
नेमकी काय समस्या आहे?
फेसबुक पूर्णपणे बंद आहे असं नाहीये. पहिल्यांदा काही लोकांना फेसबुक log in करता येत नाही. तर काहींना newsfeed दिसत नाही. काहींना फेसबुक पेज आणि प्रोफाईल पाहता येत नाही. नंतर ही समस्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरही येत आहे.
ही समस्या फक्त मोबाईल अॅपवरच नाही तर डेस्कटॉप ब्राउजवरही येत आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
व्हॉट्सअपवर काही लोकांना फोटो व्हीडिओ आणि इतर फाइल्स पाहता येत नाहीत.
हा DDos चा हल्ला नाहीये
या अडचणी DDosच्या हल्ल्यामुळे येत नाहीत. जेव्हा हॅकर एखाद्या वेबसाइटवर नकली ट्रॅफिक पाठवतो तेव्हा त्या वेबसाइटच्या सर्व्हरवर विनाकारण जाम येतो. त्यामुळे ती वेबसाइट स्लो होते किंवा ठप्प होते. अशा घटनेला DDos हल्ला म्हणतात.
downdetector या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार outageमुळे 11 हजाराहून अधिक युजर्सना अडचणींना सामना करावा लागत आहे.
जर तुम्हालाही फेसबुक वापरण्यात अडचणी येत असतील तर या वेबसाइटवर तुम्ही ती रिपोर्ट करु शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
फेसबुक वापरता येत नसल्यानं अनेकजणांनी ट्विटरचा मार्ग अवलंबला आहे. त्यावर लोक स्क्रिनशॉट आणि meme शेअर करत आहेत.
या समस्येचा निवाडा कधीपर्यंत होईल याविषयी फेसबुकनं काहीच सांगितलेलं नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)