You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेश: विमान 'हायजॅक करण्याचा प्रयत्न', एक संशयित ताब्यात
बांगलादेशात एका विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. ढाक्याहून दुबईला जाणाऱ्या या विमानात 142 प्रवासी होते.
बांगलादेश एअरलाइन्सच्या एका विमानाला आपत्कालीन परिस्थितीत चितगावच्या शाह अमानत विमानतळावर उतरवण्यात आल्याचं बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका संशयिताने विमानाच्या कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला अटक करण्यात आल्याचं AFP वृत्तसंस्थेनं सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.
बांगलादेशच्या नागरी उड्डयन आणि पर्यटन मंत्रालयाचे सचिव मोहम्मद महिबुल हक यांनी बीबीसीला सांगितलं की विमानाचा पायलट आणि प्रवासी सुरक्षित आहे. मात्र एक संशयित प्रवासी आणि क्रू मेंबर विमानाच्या आत आहे.
संशयित प्रवाशाशी चर्चा करण्यात येत आहे. चर्चा नक्की काय आहे, हे अजून कळलेलं नाही. सध्या हे विमानतळ बंद करण्यात आलं आहे.
त्यातच विमानात असलेले बांगलादेशचे खासदार मोईनुद्दीन खान यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं की एका प्रवाशाने विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र विमानातल्या प्रवाशांना सुरक्षित उतरवलं गेलं आणि सगळे प्रवासी सुरक्षित आहेत. संशयिताने शेख हसीना वाजेद यांच्याशी बातचीत करायची असल्याचं सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)