You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युजिन : इन्स्टाग्रामवरील त्या अंडयाचं रहस्य अखेर उलगडलं
इन्स्टाग्रामवर ज्या अंड्याला आतापर्यंत सगळ्यात जास्त लाईक्स मिळाले होते. त्या अंड्याचं रहस्य उलगडलं आहे. मानसिक आरोग्याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी या अंड्याचा वापर केल्याचं आता उघडकीस आलं आहे.
युजिन या नावाने हे अंडं ओळखलं जातं. या अंड्याकडे लोकांचं फारच लक्ष गेल्यामुळे त्याला तडे गेले आहेत.
जर तुमच्या डोक्यालाही असेच तडे पडत असतील तर नक्की मदत मागा असा मेसेज या अंड्याच्या बाजूला लिहिला आहे.
जानेवारीमध्ये टाकलेल्या मूळ छायाचित्राला आतापर्यंत 5.2 कोटी लाईक्स मिळाले आहेत.
जेव्हा पहिल्यांदा या अंड्याचा फोटो पोस्ट करण्यात आला तेव्हा केली जेनर यांना 'क्वीन ऑफ इन्स्टाग्राम' बनण्यापासून रोखणं हा एकमेव उद्देश आहे की काय असं वाटलं.
त्याबरोबर एक मेसेजही होता. त्यात, "चला एक जागतिक विक्रम रचूया आणि इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त लाईक मिळालेली पोस्ट तयार करूया. सध्याच्या केली जेनर यांच्या फोटोचा रेकॉर्ड (1.8 कोटी) तोडूया."
केली जेनर यांच्या फोटोचा रेकॉर्ड तोडायला या फोटोला फक्त नऊ दिवस लागले. केली यांनी त्यांच्या नवजात मुलीबरोबर एक फोटो टाकला होता. तिचं स्ट्रॉमी असं नाव होतं.
या अंड्याला तडा गेलेले सहा वेगवेगळे फोटो चार जानेवारी पासून @world_record_egg या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये हे अंडं तडकताना दिसत आहे. त्यासोबत एक कॅप्शन लिहिलं आहे. "हुश्श.. आता मला फार बरं वाटतंय.
तुम्हालाही असाच तणाव जाणवत असेल तर अधिक माहितीसाठी talkingegg.info या वेबसाइटला भेट द्या. चला एकत्र मिळून हे उभारुया."
हे सगळं प्रकरण म्हणजे Hulu या स्ट्रिमिंग साईटच्या कार्यक्रमाचा एक भाग होता. पण आता हे अंडं इन्स्टाग्रामवर जास्त बघायला मिळतं.
तिथे एक लिंक आहे जी तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जाते. तिथे वेगवेगळ्या देशांची नावं आहेत. तिथे मानसिक आरोग्याच्या सुविधांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
या हँडलच्या मागे कोणाचा हात आहे आणि इतक्या कमी वेळात इतके लाईक्स कसे मिळाले याबद्दल अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या.
अनेकांना यात एखाद्या मार्केटिंग कंपनीचा हात आहे असं वाटत होतं. मात्र ब्रिटनमधील जाहिरात व्यावसायिक ख्रिस गॉडफ्रे यांनी स्पष्ट केलं की त्यांनीच दोन सहकाऱ्यांबरोबर मिळून हे तयार केलं आहे. कशाचीही जाहिरात करणं हा त्यांचा उद्देश नाही. फक्त जास्तीत जास्त लाईक्स मिळवणं हाच उद्देश आहे.
आता या अंड्याला 1 कोटी फॉलोअर्स आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे.
या उपक्रमामागे असलेल्या टीमच्या मते हुलू ने पैसे दिलेत का याबद्दल वाच्यता केली नाही तसंच या अंड्याच्या माध्यमातून आणखी काही गोष्टींची जाहिरात होणार का याबद्दलही माहिती दिलेली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)