बर्फाचा बंगला, बर्फाचा किल्ला आणि स्नोमॅन : चीनमध्ये गारेगार महोत्सव

'द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल'चं शनिवारी उद्घाटन झालं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, 'द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल'चं शनिवारी उद्घाटन झालं.

जगातील सर्वांत मोठ्या 'आइस फेस्टिव्हल'पैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल'ला ईशान्य चीनमध्ये सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये बर्फातून साकारलेले किल्ले, चमकणारी शिल्पं आणि हजारो 'स्नोमेन' पर्यटकांचं आकर्षण ठरत आहेत.

या फेस्टिवलमधले काही फोटोः

द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं फेस्टिव्हलला सुरूवात झाली.
द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक या फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावतात.
द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, बर्फाची ही जादुई नगरी साकारण्यासाठी 1,20,000 क्युबिक मीटर बर्फ आणि 1,11,000 क्युबिक मीटर हिमखंड वापरण्यात आले.
द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, ज्या शहरात पारा उणे 35 अंशापर्यंत घसरतो, तिथे हजारो कलाकार आणि कामगार बर्फातून कलाकृती साकारत होते.
द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, थंडीनं गोठलेल्या शोन्झुआ नदीवर 2,019 'स्नोमेन' उभे करण्यात आले आहेत.
द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, कुडकुडायला लावणाऱ्या थंडीतही इथे पोहण्याची स्पर्धा भरविण्यात येते. यंदा 300हून अधिक लोकांनी पाण्यात उतरण्याचं धाडस केलं.
द हार्बिन इंटरनॅशनल आइस अँड स्नो स्क्लप्चर फेस्टिव्हल

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, 1980पासून दरवर्षी हा महोत्सव भरविण्यात येतो.

महोत्सवाचा समारोप फेब्रुवारी महिन्याच्या 5 तारखेला होणार आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)