You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिकाऱ्याला अजब शिक्षाः हरणावरचा कार्टूनपट 'बाम्बी' नियमित पाहण्याचा आदेश
बाम्बी नावाच्या हरिण बालकाची गोष्ट शाळेत असताना वाचल्याचं आठवत असेल. त्यावरचा एक सुंदर चित्रपटही अनेकांनी पाहिला असेल. एका छोट्या पिलाच्या भावविश्वात नेणारी ही गोष्ट मनाला आनंद देते. मात्र एखाद्याला शिक्षा देण्यासाठी त्याचा वापर झाला तर?
अमेरिकेतील एका न्यायालयाने शेकडो हरणांची शिकार करणाऱ्या एका शिकाऱ्यालाच ही विचित्र शिक्षा दिली आहे. त्याने महिन्यातून किमान एकदा तरी बाम्बीची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायचा आहे.
गुन्हेगाराला केवळ शिक्षा देणं पुरेसं नसतं, तर त्याच्या चुकीची जाणीवही करुन देणं आवश्यक असतं. अमेरिकेतील मिसुरीमधल्या न्यायालयाच्या निकालाने हीच बाब आधोरेखित केली आहे. शेकडो हरणांची बेकायदेशीररित्या शिकार केल्याबद्दल डेव्हिड बेरी (ज्युनिअर) या व्यक्तीला न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मात्र ज्या निष्पाप जीवांची आपण हत्या केली, त्यांच्या आयुष्याची किंमत कळावी यासाठी डेव्हिडला महिन्यातून एकदा बाम्बी पाहण्याचाही आदेश दिला आहे.
आता या क्लासिक कार्टून चित्रपटाचा अपेक्षित परिणाम डेव्हिडवर होतो की नाही हे इतक्यात तरी स्पष्ट होणार नाही. मात्र अमेरिकेत गुन्हेगारांना अशा अजबगजब शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ नाही.
गाढवांसोबत वरात
शिकागोमधल्या दोन तरुणांना 2003 साली 45 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर न्य़ायालयाने या दोघांना त्यांच्याच शहरामध्ये गाढवांसोबत फिरण्याचेही आदेश दिले होते. चर्चने ख्रिसमसच्या संध्याकाळी दाखविण्यासाठी येशूच्या जन्माचा जो देखावा केला होता, त्यातील बाल येशूच्या मूर्तीची विटंबना जेसिका लँग आणि ब्रायन पॅट्रिक या जोडगोळीनं केली होती.
शिक्षण पूर्ण करण्याची शिक्षा
मनुष्यहत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्याने टायलर आल्रेड या 17 वर्षाच्या मुलाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र त्याच्या भविष्याचा विचार करून न्यायालयाने त्याला पुढील शिक्षण पूर्ण करण्याचाही आदेश दिला. त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून वेल्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा त्याचप्रमाणे नियमितपणे ड्रग, अल्कोहोल आणि निकोटीन सेवनाच्या चाचण्याही द्याव्यात असे आदेश त्याला दिले आहेत. पुढील दहा वर्षे नियमितपणे चर्चमध्ये जाण्याची सूचनाही त्याला करण्यात आली आहे.
पॉकेटमनी नाही, नोकरी शोधा!
दक्षिण स्पेनमधल्या एका शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने आपल्या आई-वडिलांना कोर्टात खेचलं. ते आपल्याला पॉकेटमनी देत नाहीत, अशी त्याची तक्रार होती. मात्र फॅमिली कोर्टातील न्यायाधीशांनी त्याची मागणी फेटाळून लावली. इतकंच नाही तर त्याला एका महिन्याच्या आत घर सोडून जाण्याचा आणि स्वतःसाठी नोकरी शोधण्याचाही आदेश दिला.
शास्त्रीय संगीत ऐकल्यास शिक्षेत सवलत
अँड्रयु व्हॅक्टर हा तरुण आपल्या गाडीत अतिशय मोठ्याने रॅप गाणी वाजवत होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 120 पौंडांचा दंड केला होता. मात्र न्यायाधीशांनी त्याच्या दंडाची रक्कम 20 पौंडांनी कमी करण्याची तयारी दाखवली. त्याबदल्यात महिनाभर अँड्रयुला बाख, बिथोव्हेन या संगीतकारांच्या रचना ऐकण्याची
हेही वाचलंतत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)