आफ्रिकेच्या जंगलात जिराफ वाचवण्यासाठी सुरू आहे संघर्ष

गेली 50 वर्षं नायजेरमधील गडाबेदजी बायोस्फेअर रिजर्वमधले पश्चिम आफ्रिकेन जिराफ दिसले नव्हते.

अवैध शिकार, हवामान बदल, पारिस्थितिकीय बदलांमुळे नायजेरियातले जिराफ धोक्यात आहेत, असं संशोधनात दिसून आले आहे.

महत्त्वाकांक्षी संवर्धन प्रकल्पांतर्गत सध्या 8 जिराफ या अभयारण्यात आणण्यात आलं होते. पश्चिम आफ्रिकेत पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात आहे.

याअंतर्गत, जिराफ आणि मनुष्य एकाच ठिकाणी राहतात अशा प्रदेशातून सरकारने 8 जिराफांना पकडलं आहे. राजधानी नियामेच्या आग्नेयकडे 60 किमी दूर असलेल्या ठिकाणावरून हे जिराफ पकडण्यात आलेत.

आतापर्यंत जगातील शेवटचे पश्चिम आफ्रिकन जिराफ फक्त याच ठिकाणी सापडत होते.

हे पश्चिम आफ्रिकेतले जिराफ हे मनुष्यवस्तीतच राहतात.

पण, वाढती लोकसंख्या, शिकार आणि वाढतं शेतीचं क्षेत्रफळ यामुळे जिराफांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.

अशा 8 जिराफांना पकडून त्यांना बायोस्फेअर रिजर्वमध्ये नेण्यात आलं.

गेल्या 30 वर्षांमध्ये जिराफांची संख्या कमी होत आहे, असं Giraffe Conservation Foundation (GCF) च्या संशोधनात दिसून आलं आहे.

एकेकाळी जिराफ हा नायजेरिया, माली, सेनेगल अशा एकूण पश्चिम आफ्रिकेत सगळीकडे आढळायचे.

1990च्या दशकात फक्त 49 इतके पश्चिम आफ्रिकी जिराफ नैसर्गिक अधिकावासात होते. International Union for Conservation of Nature's (IUCN) च्या यादीत 2008मध्ये या प्रजातींची नोंद संकटग्रस्त म्हणून करण्यात आली. सततच्या प्रयत्नांतून ही संख्या 600 इतकी झाली आहे. नव्या प्रयत्नातून जिराफच्या संवर्धनाल हातभार लागले, अशी या संस्थांना वाटते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)