खाशोग्जी हत्येनंतरही ट्रंप यांच्याकडून सौदी अरेबियासोबतच्या संबंधांची पाठराखण

फोटो स्रोत, SAUDI KINGDOM COUNCIL
जमाल खाशोग्जी यांच्या हत्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सौदी अरेबियासोबतच्या संबंधांची पाठराखण केली आहे.
"सौदी अरेबियाचं राजघराणं अमेरिकेत प्रचंड गुंतवणूक करणारा एक खंबीर भागीदार आहे," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. "कोणत्याही परिस्थितीत आमचे सौदी अरेबियाशी संबंध सुरळीत राहतील," असंही ट्रंप म्हणाले.
पत्रकार जमाल खाशोग्जी यांची टर्कीची राजधानी इस्तंबूलच्या सौदीच्या दूतावासात 2 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली होती.
अनियंत्रित एजंटनं खाशोग्जी यांची हत्या केली होती. त्यात सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा काहीही हात नव्हता, असं सौदी अरेबियानं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. मात्र US मधील माध्यमांचं मात्र वेगळं म्हणणं आहे. त्यांच्या मते, CIAला असा विश्वास आहे की सलमान यांनीच या हत्येचा आदेश दिला होता.
"या दु:खद घटनेबद्दल सलमान यांना माहिती होती, हे शक्य आहे. त्यांनी हे घडवून आणलं असेलही किंवा नसेलही," असं ट्रंप यांनी म्हटलं आहे. "तसंच CIAने अजून या हत्येविषयी अंतिम निष्कर्ष काढलेला नाही," असंही ते म्हणाले आहेत.
"खशोग्जी यांच्या हत्येसंदर्भात टर्कीनं दिलेल्या रेकॉर्डिंग ऐकण्यास मी नकार दिला आहे," असं ट्रंप यांनी Fox Newsला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
सौदीच्या अपेक्षेप्रमाणेच हे घडलं - बीबीसी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लीस ड्यूसेट यांचं विश्लेषण
सौदीच्या अपेक्षेप्रमाणेच हे झालं आहे. ट्रंप हे राजघराण्याचे खरे मित्र म्हणून वर्तन करतील, असं राजघराण्यानं म्हटलं होतं. खाशोग्जी यांच्या हत्येनंतर ट्रंप संबंध तोडणार नाहीत, असं सौदीला वाटत होतं.

फोटो स्रोत, REUTERS
खाशोग्जी यांची हत्या युवराज सलमान यांनी घडवून आणली, यावर आमचा विश्वास बसत नाही, असं सौदीच्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते सौदीला या हत्येचे परिणाम अनेक वर्षं भोगावे लागतील.
जागतिक परिणाम
ट्रंप यांच्या वक्तव्याचे मध्यपूर्व आणि त्यापलीकडे होणारे परिणाम गंभीर असू शकतात, असं बीबीसीचे राजनैतिक प्रतिनिधी जोनाथन मार्कस यांनी म्हटलं आहे.
या क्षेत्रातील अमेरिकेची धोरणं सौदी अरेबियातील मोहंमह बिन सलमान आणि इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी खूप जवळून जोडले गेले आहेत. त्यामुळे या देशांत एक स्वतंत्र मध्यस्थ म्हणून कसं काम करायचं, याची चिंता अमेरिकेला सतावणार आहे.
इतकंच नाही ट्रंप यांच्या या धोरणामुळे पश्चिमेकडील सहकाऱ्यांना आणखी निराश होतील. तसंच मॉस्को आणि चीन हे 'रशिया फर्स्ट' आणि 'चीन फर्स्ट' या धोरणांना आणखी कटवाळतील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ यांनी ट्रंप यांचं हे वक्तव्य अपमानजनक असल्याचं ट्वीट केलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








