जमाल खाशोग्जींच्या हत्येत युवराज सलमान यांचा सहभाग नाही - सौदी अरेबिया

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदल अल झुबेर

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदल अल झुबेर

पत्रकार जमाल खाशोग्जी यांची हत्या ही 'मोठी चूक' आहे, पण यामध्ये युवराज मोहम्मद बिन सलमान यांची काही भूमिका नाही, असं स्पष्टीकरण सौदी अरेबियानं दिलं आहे.

या घटनेसाठी अनियंत्रित एजंट जबाबदार आहे, पण या हत्येत सलमान यांचा काही हात नसल्याचं सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदल अल झुबेर यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं.

खाशोग्जी हेयुवराज सलमान आणि सौदी सरकारचे टीकाकार मानले जायचे. सलमान हे सौदी अरेबियाचे सर्वांत शक्तिशाली व्यक्ती आहेत, असं देखील म्हटलं जातं.

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद-बिन सलमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद-बिन सलमान

2 ऑक्टोबर रोजी तुर्कीच्या इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात खाशोग्जी गेले आणि परत आलेच नाही. ते इथून सुखरूप बाहेर पडले, असं सौदी अरेबियानं दोन आठवडे म्हटलं.

पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांनी मान्य केलं की खाशोग्जी यांचा एका मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

आंतरराष्ट्रीय दबाव आणखी वाढल्याने खाशोग्जी यांचं नेमकं काय झालं, हे सांगणं सौदीला भाग होतं. तुर्कीच्या अधिकाऱ्यांना वाटतं की त्यांची हत्या सौदीच्या एजंट्सनी केली असावी.

अखेर खाशोग्जी यांची हत्या झाल्याची कबुली झुबैर यांनी दिली.

गुन्हेगारांना शिक्षा होणार

"या घटनेची चौकशी होईल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईलच. ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे त्यांनी अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. निश्चितच ही एक मोठी चूक आहे," असं झुबैर म्हणाले.

जमाल खाशोग्जी

फोटो स्रोत, Reuters

खाशोग्जी यांचा मृतदेह कुठे आहे याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणात 18 जणांना अटक झाल्याचं सौदी अरेबियानं सांगितलं. गुप्तहेर खात्याच्या यंत्रणेत बदल घडावा यासाठी युवराज सलमान यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम बनवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

सौदी अरेबियानं दिलेले स्पष्टीकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमान्य केलेलं आहे. सौदी अरेबियाकडून जोपर्यंत स्पष्ट उत्तर मिळणार नाही तोपर्यंत माझं समाधान होणार नाही असं ते म्हणाले.

या घटनेमुळे सौदी अरेबियावर निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यांच्यासोबत शस्त्रांचा व्यवहार बंद केल्यानं आमच्याच अडचणीत वाढ होईल, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.

जमाल खाशोग्जी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जमाल खाशोग्जी

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीनं एक निवेदन जाहीर केलं आहे. "या प्रकरणात काय झालं, हे सांगण्यात यावं. या हत्येचं कोणत्याच प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. आम्ही या हत्येचा निषेध करतो," असं ते म्हणाले.

सौदी अरेबियाचे शेजारी राष्ट्र युवराज सलमान यांच्या पाठीशी उभे आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यामुळे कुवैतनं सलमान यांची स्तुती केली आहे. तसंच इजिप्त, बहारीन आणि युएईनं देखील त्यांची स्तुती केली आहे.

मुलाला फोन करून दिल्या संवेदना

दरम्यान, राजे सलमान आणि युवराज यांनी खाशोज्गी यांच्या सालह नावाच्या मुलाला रविवारी फोन करून संवेदना व्यक्त केल्या. सालह खाशोज्गी सौदी अरेबियामध्ये राहतात आणि खाशोज्गी जेव्हा अमेरिकेत राहत होते, तेव्हा त्यांना भेटण्यास मनाई केली होती.

जमाल खाशोज्गी यांच्या वाग्दत वधू हातिस सेंगिझ यांना 24 तास पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे, असं तुर्कीच्या अंडोलू न्यूजने एका बातमीत म्हटलं आहे. सेंगिझ यांनीच खाशोज्गी बेपत्ता झाल्याचं पहिल्यांदा लक्षात आणून दिलं होतं.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)