दीपिका-रणवीरच्या लग्नाचा पूर्ण अल्बम पाहा इथे

रणवीर आणि दीपिकाचं लग्न इटलीच्या लेक कोमो इथल्या 'विला डेल बालबीएनलो' या निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडलं.

या लग्नातली क्षणचित्रं आतापर्यंत जगासमोर आली नव्हती. दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगली होती. गंमत म्हणजे त्यांनी लग्नाची तारीख आणि ठिकाण आधी जाहीर करूनसुद्धा समारंभाचे फोटो फारसे लीक झाले नाही, म्हणून त्यांच्या फॅन्समध्ये नाराजी होतीच.

पण चिंता नको. आता इथे पाहा त्यांच्या लग्नाचा पूर्ण अल्बम, म्हणजे मेहंदीपासून विदाईपर्यंतचे सगळे फोटो.

दीपिका आणि रणवीर पाच वर्षांपुर्वी रामलीला या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र आले आणि पाच वर्षांनी त्यांनी अग्नीच्या साक्षीने एकमेकांसोबत आयुष्य काढण्याच्या आणाभाका घेतल्या.

दीपिका कोकणी तर रणवीर सिंधी आहे. त्याचं आडनाव भवनानी आहे.

2013 साली एका इंटरव्यूमध्ये रणवीरने सांगितलं की दीपिका त्याला किती आवडते. तो सांगतो की मी आयुष्यात अनेकदा प्रेमात पडलो आहे. पण दीपिकाबद्दल जे वाटतं तसं कधीच कोणाबद्दल वाटलं नाही.

मंगळवारी कोकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला. नंतर मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात लग्न झालं.

सुरुवातीला काही महिने दोघांनीही आपल्या नात्याबद्दल बोलणं टाळलं होतं.

कोकणी आणि सिंधी अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय.

लेक कोमो, जिथे रणवीर आणि दीपिका यांचं लग्न झालं, हा इटलीतला तिसरा सर्वांत मोठा तलाव आहे.

मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात लग्न झालं. गुरुवारी सिंधी पद्धतीने हे दोघे पुन्हा विवाहबद्ध झाले.

आपल्या लग्नातले फोटो कुठेही लीक होणार नाही याची काळजी दीपिका आणि रणवीर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत घेतली होती.

या दोघांनीही लग्नातले कोणत्याही प्रकारचे फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट त्यांनी आपल्या पाहुण्यांपुढे ठेवली होती.

या सोहळ्यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश करू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्या दोघांचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर या सोहळ्याचे फोटो जगासोर आलेच.

.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)