बर्फावर चढणाऱ्या अस्वलाच्या त्या व्हायरल व्हीडिओ मागचं सत्य

फोटो स्रोत, you tube
- Author, बीबीसी हिंदी टीम
- Role, नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांत एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. एक मादी अस्वल तिच्या पिल्लासोबत बर्फाचा डोंगर चढत आहे पण तिचं पिल्लू घसरत खाली जातं.
त्याची आई माथ्यावर पोहोचते पण ते पिल्लू वर पोहोचू शकत नाही. पण ते हार मानत नाही. पुन्हा प्रयत्न करून ते वर येतं. त्याला पकडण्यासाठी ती आई पुढे सरकते मग पुन्हा ते खाली घसरतं यावेळी ते खूप खाली जातं पण तिथून ते वर येतं आणि मग आईसोबत जंगलाकडे निघून जातं.
हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अनेक जण या व्हीडिओला प्रेरणादायी देखील म्हणत आहे. पण हा व्हीडिओ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा व्हीडिओ ड्रोननं शूट करण्यात आला असून त्या ड्रोनमुळे मादी अस्वल चवताळली असा आरोप होत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
(थर्ड पार्टी कंटेट असल्यामुळे जाहिराती असू शकतात)
हा व्हीडिओ दिमित्री केद्रोव यांनी शूट केला आहे. या व्हीडिओवर नॅशनल जिओग्राफिकनं भाष्य केलं आहे, "जेव्हा माथ्यावर मादी अस्वल पोहोचतं आणि ते पिल्लू माथ्याच्या अगदी जवळ येतं त्यावेळी ड्रोन समोर आल्यामुळे आणि त्याचा आवाज आल्यामुळे ती आई चवताळली आणि तिने बर्फावर पंजा मारला. त्यामुळे ते पिल्लू खाली घसरलं. ड्रोनमुळे अस्वलासाठी आणखी अवघड परिस्थिती निर्माण झाली असू शकते. त्यांचं म्हणणं आहे की असं देखील होऊ शकतं की ड्रोनपासून सुरक्षित राहावं या भावनेतूनच अस्वलानं अवघड रस्ता निवडला."
इदाहो युनिव्हर्सिटीतील नॅचरल सायन्सच्या तज्ज्ञ सोफी गिल्बर्ट सांगतात की, मादी अस्वलाच्या दृष्टीनं तुम्ही पाहिलं तर त्याला ड्रोन म्हणजे एखादी अनोळखी वस्तू वाटू शकते. जर सोबत पिल्लू असेल तर ती आणखी आक्रमक होऊ शकते.

फोटो स्रोत, you tube
हा व्हीडिओ बनवणारे दिमिग्रा केद्रोव्ह यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे, "ड्रोनमुळे त्या अस्वलांना काही त्रास झाला नाही. जी दृश्यं अगदी जवळून घेतली आहेत ती झूम करून किंवा पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंगचा भाग आहे."
केद्रोव्ह सांगतात की, "ड्रोनचा आवाज येण्यापूर्वी अस्वलाचं पिल्लू घसरलं होतं. या गोष्टी प्राण्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत. आम्ही त्यांच्यावर रोज नजर ठेऊन असतो."
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ड्रोनच्या उपस्थितीमुळे वन्यप्राण्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








