'ध' चा 'मा' झाला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झाले 'भिकारी'

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

'ध' चा 'मा' केल्याने किती अनर्थ घडू शकतो, हे आपण जाणतोच. अशीच काहीशी वेळ पाकिस्तानच्या सरकारी न्यूज चॅनलवर ओढावली आहे.

पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन म्हणजेच PTV हे पाकिस्तानचं सरकारी न्यूज चॅनल आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीन दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणाचं थेट प्रक्षेपण या चॅनलवर सुरू होतं. त्यात 'बिजिंग'ऐवजी या वाहिनीने चुकून 'बेगिंग' असा शब्द लिहिला. बेगिंगचा अर्थ भीक मागणे असा होतो.

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जातोय. या संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनकडून काही आर्थिक मदत मिळते का, यासाठी पंतप्रधान इम्रान खान चीनच्या दौऱ्यावर गेले. पैशांची मदत मिळवण्यासाठी गेलेल्या इम्रान खान यांच्या भाषणाच्या प्रक्षेपणातच बिजिंग ऐवजी 'बेगिंग' म्हणजेच भीक मागणे असा शब्द वापरल्याने PTV वर मोठी नामुष्की ओढावली आहे.

ट्विटरवर तर मोठा हशा पिकला आहे. इम्रान खान यांनी बिजिंगमधल्या सेंट्रल पार्टी शाळेत भाषण केलं. या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावेळी ही चूक झाली.

या प्रकारानंतर PTVनं ट्विटरवर एक छोटं स्पष्टीकरण देत घडलेला प्रकार खेदजनक असल्याचं म्हटलं. तसंच संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असंही सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर चीनने पाकिस्तानातल्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीवर चीन ठाम असल्याचं म्हटलं आहे.

जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या दौऱ्यादरम्यान इम्रान खान यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली.

चीन पाकिस्तानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून रस्त्यांची उभारणी करत आहे. चीनसाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला आशियासोबतच युरोप आणि आफ्रिकेपर्यंत व्यापार विस्तार करणं सोप होणार आहे.

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पैशांची चणचण असलेल्या पाकिस्तानला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

इम्रान

फोटो स्रोत, Izh@R khAN

सौदी अरेबियाने गेल्याच महिन्यात पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर्सचं बेलआऊट पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मात्र ही मदत पुरेशी नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बेलआऊट पॅकेज मागण्याची पाकिस्तानची योजना आहे. 1980च्या अखेरपासून आंतरराष्ट्रीय कर्जदात्या राष्ट्रांकडून पाकिस्तानला मिळालेलं हे तेरावं बेलआऊट पॅकेज आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या टीव्ही वाहिनीकडून झालेल्या उपरोधाला त्या टीव्ही वाहिनीसह तिथलं सरकार आणि सामान्य नागरिकांनी गांभिर्याने घेतलं आहे.

PTVचे न्यूज डिरेक्टर, करंट अफेअर डिरेक्टर, आयटी डिरेक्टर आणि इतर तिघांना निलंबित करण्यात आल्याचं PTVच्या सूत्रांनी सांगितल्याचं ट्विट पाकिस्तान मीडिया वॉचने केलं आहे. हे आदेश थेट पंतप्रधानांकडून आल्याचं कळतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)