You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चक्रीवादळ : फिलिपीन्समध्ये 59बळी; चीनमध्ये 24 लाख लोकांना हलवले
फिलिपीन्स आणि हाँगकाँगनंतर आता मांगखुट हे चक्रीवादळ चीनमध्ये पोहोचलं आहे. या वादळाने वारे ताशी 162 किलोमीटर वेगाने वाहत आहेत, ज्यामुळे मुसळधार पाऊसही पडत आहे.
हाँगकाँगमध्ये या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः उंच इमारतींना या वादळाचा फटका बसला. इथं जखमींची संख्या 200 इतकी झाली आहे.
चीनमध्ये ग्वांगडूंग या शहरात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. 2018मधील हा सर्वांत भयंकर चक्रीवादळ आहे. चीनमध्ये जवळपास 24 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
फिलिपिन्सलाही या चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात किमान 59 लोकांचा बळी गेला. शिवाय, सार्वजनिक वाहतूक, संपर्क व्यवस्था कोलमडली असून संपत्तीचीही मोठी हानी झाली आहे.
टुगौगारो या शहराला सर्वाधिक फटका बसला असून इथं प्रत्येक घराचं नुकसान झालं आहे. जवळपास 40 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
यापूर्वी 2013मध्ये आलेल्या चक्रीवादळात फिलिपिन्समध्ये 7 हजार लोकांचा बळी गेला होता. यावेळी मात्र आपत्ती व्यवस्थापनात बरीच सुधारणा झाली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)