मुंबईपेक्षा 10 पट मोठा राक्षसी हिमखंड अंटार्क्टिकातून तुटला

    • Author, जॉनथन अॅमॉस
    • Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी

अंटार्क्टिका इथं तुटलेला हिमखंड हालू लागला असून तो उत्तरेकडे सरकत आहे. या हिमखंडाचा आकार 6000 चौरस किलोमीटर इतका आहे. म्हणजेच हा हिमखंड मुंबईपेक्षा जवळपास 10 पट मोठा आहे.

अंटार्क्टिकाच्या द्वीपकल्पासून हा हिमखंड 13 महिन्यांपूर्वीच तुटला होता. याच वजन 1 लाख कोटी टन इतकं आहे. हा हिमखंड आपल्या जागेवर मागे-पुढे हालला होता. पण आता या हिमखंडाचा दक्षिण भाग 90 अंशात वळला आहे. म्हणजे हा हिमखंड समुद्रातील प्रवाहात सापडला आहे, याचं हे निदर्शक आहे.

तज्ज्ञांना असं वाटत की उन्हाळ्यात हा हिमखंड हळूहळू उत्तरेकडे सरकेल.

या हिमखंडाच नाव A-68 असं आहे.

स्वॅनसी युनिव्हर्सिटीचे प्रा. अॅड्रीन ल्युकमेन म्हणाले, "हा हिमखंड लार्सन सी आईस शेल्पपासून 12 जुलै 2017ला तुटला होता. एक वर्ष त्याची मागे-पुढे हालचाल झाली. आता हा हिमखंड पुढे सरकू लागला आहे."

पूर्वेला बर्फ आणि उत्तरेला उथळ पाणी यात हा हिमखंड अडकला होता.

ते म्हणाले, "पण वाऱ्याच्या झोतामुळे आता हा हिमखंड हालला आहे. समुद्राचं पाणी घड्याळाच्या काठ्याच्या दिशेत फिरत आहे, त्यामुळे इथं तरंगणाऱ्या बर्फाने हा हिमखंड फिरवला आहे. आता हिमखंड मोकळा झाला आहे. तो आता अधिकाधिक उत्तरेकडे जास्त उबदार पाण्याकडे सरकत आहे."

खंडाच्या आकारांच्या हिमखंडात Pivot and Spin ही हालचाल दिसून येते. अशा प्रकारची हालचाल सामान्य असते. या हिमखंडाचा जमिनीमध्ये रुतलेला जो भाग आहे त्यामुळे समुद्राच्या तळाशी मोठी खच तयार होते.

ही खच आंतरराष्ट्रीय संस्था काम करत असलेल्या Sonar Surveysमध्ये दिसून येईल. या वर्षाच्या अखेरीस हा सर्व्हे होणार आहे.

जर्मनीतील अल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूट आणि यूकेतील स्कॉट पोलर रिसर्च इन्स्टिट्यूट हे संशोधन करणार आहेत.

A-68च्या काही कडा वर्षाभरात तुटल्या असल्या तरी याचं क्षेत्रफळ फारस बदलेलं नाही. याची लांबी जवळपास 150 किलोमीटर आणि रुंदी जवळपास 55 किलोमीटर इतकी आहे.

एका अमेरिकन संस्थेने या हिमखंडाला आतापर्यंतचा सर्वांत मोठ्या हिमखंडांच्या यादीत 6वा क्रमांक दिला आहे.

मागचा इतिहास पाहिला तर असे हिमखंड समुद्रातील चार मोठ्या 'Iceberg Highways'पैकी एकावरून जातात असं दिसतं.

या प्रकारात हा हिमखंड दक्षिण अटलांटिककडे सरकेल असं दिसतं.

म्हणजेच दक्षिण जॉर्जियातील पेंग्विन आणि सील्सना हा हिमखंड पुढं सरकताना पाहायला मिळेल!

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)