You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सूपमध्ये मेलेले उंदीर : चीनमध्ये रेस्टॉरंटला 13 अब्ज रुपयांचा फटका
सूपमध्ये मेलेले उंदीर सापडल्यानंतर या रेस्टॉरंटचे शेअर गडगडले आहेत. सोशल मीडियावर या विषयाची मोठी चर्चा सुरू आहे.
सूपमध्ये उंदीर आढळल्यामुळे एका रेस्टॉरंटला फार मोठा फटका बसला आहे. सूपमध्ये मरून पडलेल्या या उंदराचे फोटो सोशल मीडियावर शेअर होऊ लागल्याने या रेस्टॉरंट कंपनीचे शेअर चांगलेच कोसळले आहे. हा फटका जवळपास 190 दशलक्ष डॉलर इतका आहे. म्हणजे भारतीय चलनातील हे मूल्य जवळपास 13 अब्ज 71 कोटी इतकं होतं.
क्षीआबू क्षीआबू या रेस्टॉरंटचे शेअर या वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. चॉपस्टिकमध्ये धरलेले या उंदराचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर झाला होता. या घटनेनंतर शानडाँग प्रांतातील रेस्टॉरंटचे हे आउटलेट बंद करण्यात आलं आहे.
एका गरोदर महिलेला रेस्टॉरंटमधील सूपमध्ये मेलेलं उंदीर मिळून आलं होतं.
या आउटलेटने संबंधित व्यक्तीला 5 हजार युआन इतकी नुकसान भरपाई देऊ केली असल्याचे वृत्त आहे.
स्थानिक माध्यम संस्था कानकन न्यूजने या महिलेच्या नवऱ्याशी संपर्क साधला. त्याचं नाव मा असं सांगण्यात येत आहे. त्यांनीही नुकसान भरपाई नकारली आहे. नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारण्यापूर्वी बायकोची संपूर्ण वैद्यकीय चाचणी करू असं ते म्हणाले आहेत.
ही गरोदर महिला कुटुंबासह जेवणासाठी रेस्टॉरंटच्या आउटलेटमध्ये गेली होती. त्यांनी यातलं थोड सूप घेतलं होतच तोवर त्यांना यात उंदीर मरून पडल्याचं दिसलं.
जर माझ्या बायकोने तिच्या आरोग्याची अतिकाळजी केली, गर्भपाताचा धोकाही आहे. असं सांगत या आउटलेटमधील एका कर्मचाऱ्याने भरपाई म्हणून 20 हजार युआन इतकी मदत देऊ केली, असा आरोप मा यांनी केला.
चीनमधील सोशल मीडिया Weibo वर या सूपचे आणि त्यात मेलेल्या उंदराचे फोटो वेगाने शेअर झाले. नेटिझन्सनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला उलटी सारखं होत आहे, आणि मी परत कधी अशा रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
11 सप्टेंबरला या रेस्टॉरंट कंपनीचे शेअर गेल्या वर्षाभरातील सर्वांत खालच्या पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर बुधवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये सुधारणा झाली होती. जर त्या महिलेच्या बाळाला काही झालं तर तिला कशी मदत दिली जाणार आहे? आयुष्याची किंमत फक्त 20 हजार युआन आहे का? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.
या कंपनीने शनिवारी या आउटलेटमध्ये अस्वच्छता असल्याचं नाकारले होते. पण नंतर त्यांनी हा खुलासा मागे घेतला. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात तपास करू असं म्हटलं आहे.
या महिलेने जो पदार्थ घेतला होता त्याला हॉटपॉट म्हटलं जात यात सूप, भाज्या आणि मटण यांचा समावेश असतो.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)