सेक्स करताना मिळणारा आनंद मोजता येतो का?

जगात माणूस हा असा एकच प्राणी आहे जो सेक्सचा उपयोग केवळ प्रजननासाठी न करता आत्मिक सुखासाठीही करतो.

मनुष्यासाठी शारीरिक संबंध हे प्रजननाबरोबर कामसुखासाठीही महत्त्वाचं आहे, असं इटलीमधल्या रोम टोर वर्गेटा यूनिव्हर्सिटीचे मेडिकल सेक्सोलॉजीस्ट इमॅनुअल जनीनी यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे सेक्सबाबत रिसर्च करणारे अनेक वैज्ञानिक हे सेक्सच्यावेळी मिळाणारा आनंद मोजण्याचा प्रयत्न करत आहेत.

सेक्स आणि त्याच्याशी निगडित अजून एक प्रश्न सतत विचारला जातो. तो म्हणजे सेक्स करताना स्त्री आणि पुरुषापैकी सगळ्यांत जास्त आनंद कुणाला मिळतो?

प्राध्यपक जनीनी आणि इटलीतल्या इतर विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन महिलांमधील कामसूख मोजण्यासाठी एक संशोधन केलं.

हे संशोधन 'प्लोस वन' या नियतकालिकात 'ऑर्गेज्मोमीटर-एफ' या नावाने प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

महिलांच्या कामसुखाविषयी पहिल्यांदाच अशा प्रकारे संशोधन करण्यात आलं आहे, असं जनीनी यांनी बीबीसीला सांगितलं. यामध्ये सायकोमेट्रिक टूलचा वापर करण्यात आला.

"शारीरिक संबंध, हस्तमैथून आणि इतर प्रणयक्रिडाप्रकारात स्त्रीयांचं कामसुख मोजणं, हा आमच्या संशोधनाचा उद्देश होता," असं प्राध्यापक जनीनी सांगतात.

ऑर्गेज्मोमीटर म्हणजे काय?

ऑर्गेज्मोमीटर हे काही उपकरण किंवा मशीन नाहीये. ऑर्गेज्मोमीटर म्हणजे कामसूखाचं मोजमाप करणं.

अधिक स्पष्ट करत ते सांगतात, जसं दु:ख मोजण्यासाठी काही मशीन नाही. तसंच आनंद मोजायलाही मशीन नाही

आनंद आणि दु:ख हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या अनुभवावर हे अवलंबून असतं. त्यामुळे एका मोजपट्टीवर याचं मोजमाप करणं बरोबर ठरेल.

जगभरात वेदनाशामक औषधं ही 'अॅनालॉग स्केल'वर मोजल्यानंतरच ती विकली जातात. सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ते मोजण्यासाठी एखाद्या मशीनऐवजी एका मोजपट्टीचा वापर होऊ शकतो.

ज्याप्रकारे वेदनेच्या प्रमाणाचा मोजपट्टीवर (अॅनालॉग स्केल) मोजलं जातं, त्याप्रकारे आम्ही कामसुखाचं प्रमाण मोजलं. कारण, दोन्ही अनुभवाचा संबंध हा मेंदुतल्या एका भागाशी आहे. एखादी गोष्ट कुणासाठी खूप वेदनादायक असू शकते तर त्याच गोष्टीत दुसऱ्या एखाद्याचा आनंद दडलेला असू शकतो.

जनीनी असंच उदाहरण देत सांगतात, "समजा तुम्ही एखादं मसालेदार जेवण केलं, पण तुम्हाला त्याची काहीच चव लागली नाही आणि तेच दुसऱ्या व्यक्तीला खूप स्वदिष्ट आणि चवदार लागू शकतं"

सेक्सबाबत जनीनी अजून एक उदाहरण देतात, "महिलांना कामसुखासाठी क्लिटॉरिसचा भाग अत्यंत महत्त्वाच असतो. पण त्यातूनच प्रत्येकवेळी आनंद मिळेल असं नाही."

बलात्कारात शारीरिक संबध केले जातात. क्लिटॉरिसद्वारे कामउत्तेजना निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. पण, बलात्कारावेळी मात्र शारीरिक संबंधात खूप वेदना होतात. कारण, या शारीरिक संबंधात आनंद मिळत नाही असं मेंदू सुचवत असतो.

हा अभ्यास कसा झाला?

यामध्ये 526 महिलांचा समावेश केला. त्यापैकी 112 महिलांना सेक्ससंबंधित काही ना काही आजार होते.

तर इतर 414 महिलांना सेक्ससंबंधी कोणताही आजार नव्हता. या महिलांची ऑनलाइन माध्यमाद्वारे निवड करण्यात आली.

संशोधकांनी एक वेबसाइट तयार केली होती. त्यामध्ये महिलांना काही प्रश्न दिले होते.

जनीनी सांगतात, "ही एक स्मोर्ट वेबसाइट आहे. ज्यामध्ये सेक्सला समजून घेण्यासाठी महिलांना मदत मिळाली. जसं की, जर महिला बायसेक्सुअल असतील तर त्यांना पुरुष आणि स्त्री बरोबर सेक्सचे वेगवेगळे अनुभव नोंदवायला सांगितलं"

एक प्रश्न हा ऑर्गेज्मोमीटरबाबतही होता. यामध्ये महिलांना 0 ते 10 या मोजपट्टीवर त्यांचं कामसुखं मोजायला सांगितलं. 0 म्हणजे काहीही कामसुख न मिळणं तर 10 म्हणजे सर्वोच्च कामसुख मिळणं.

सेक्सनंतर लगेच 0 ते 10 या मोजपट्टीवर कामसुख मोजण्याची घाई आम्ही महिलांना केली नाही, असं जनीनी सांगतात. सेक्सनंतर लगेच किंवा एक आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतरही त्या याचं उत्तर देऊ शकतात.

"समजा तुम्ही वेगवेगळ्या डेंटिस्टकडे गेला तर कोणत्या डेंटिस्टने तुम्हाला कमी वेदना होऊ दिल्या हे तुम्ही काही काळानंतरही सांगू शकता."

हस्तमैथून, शारीरिक संबंध, ओरल सेक्स आणि इतर प्रणयक्रिडांपैकी कशामध्ये जास्त आनंद मिळतो ही बाब कुणीही सांगू शकतं, असं जनीनी यांचं म्हणणं आहे.

सेक्स करताना कुणाची भूमिका महत्त्वाची?

फ्रेंच भाषेत एक खूप प्रसिद्ध वाक्यप्रचार आहे - "महिला उदासिन किंवा निष्क्रिय नसतात, तर पुरुष असमर्थ असतात"

या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो की, सेक्स करताना पुरुषाची क्षमता अधिक महत्त्वाची असते.

पण प्राध्यापक जनीनी यांनी हा समज फेटाळून लावला आहे. "यामधून पुरुषसत्ताक मानसिकता दिसून येते. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू म्हणूण पाहिलं जातं," असं ते सांगतात

"कामसुखात पुरुषाचे हात, त्यांचे लिंग, जीभ भूमिका महत्त्वाची असते, हा एक फालतू विचार आहे, मी याच्या पूर्णपणे विरोधात आहे. माझ्या संशोधनानुसार कामसुखाची निम्मी जबाबदारी ही महिलांचीही आहे. जसं पुरुषांचं कधीकधी शीघ्रपतन होतं तसंच महिलांनाही उत्तेजित व्हायला कमी जास्त वेळ लागतो. महिलांसाठी कामसुखाचं प्रमाण बदलत असतं."

या संशोधनात सहभागी झालेल्या महिलांच वय 19 ते 35 वर्षं होतं. वयानुसार कामसुखाचं प्रमाण वाढतं असंही या अभ्यासात दिसून आलं आहे.

एक गोष्ट स्पष्ट करत जेनीनी सांगतात, "कामसुखाचा सरळ संबंध वयाशी आहे असं आम्ही म्हणत नाही, मासिक पाळी जशी येते तसं कामउत्तेजनेत बदल होतो. स्त्रीचं वय जसं 30 ते 35 वर्षं होतं तसं तीची कामोत्तेजना सर्रोच्च स्तरावर असते"

कामसुख समजून घेण्यासाठी हस्तमैथून सगळ्यांत चांगला प्रकार आहे, असं जनीनी सांगतात. त्या व्यतिरिक्त महिलां-महिलांमध्ये कामसुखात खूप तफावत आहे. पण पुरुषांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात एकसारखेपणा असतो, असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)