You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फोटो - कुत्र्याचं पिलू वाघाच्या बछड्यांबरोबर खेळतं तेव्हा...
बीजिंगधल्या एका पार्कमध्ये पाळीव कुत्र्याची छोटी पिलं जंगली प्राण्यांबरोबर खेळत असतानाची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाघ आणि सिंह यांच्यासोबत कुत्र्याचं पिलू खेळताना या फोटोंमध्ये दिसून येतं. मोगलीची कथा आठवावी अशी ही छायाचित्रं गुरुवारी टिपण्यात आली.
"या कुत्र्याच्या आईनं या सर्व जंगली प्राण्यांच्या पिलांना आपलं दूध पाजलं होतं. यामध्ये सायबेरियन टायगर, व्हाईट टायगर, आफ्रिकन लायन या प्राण्यांच्या पिलांचा समावेश आहे, ज्यांना त्यांच्या मातांनी सोडून दिलं होतं," असं माध्यमांचं म्हणणं आहे.
त्यामुळे ही सर्व पिलं एकत्र वाढली आणि आता एकमेकांच्या खूप जवळ आली आहेत.
"अस्वल, कांगारू आणि माकड यांच्यासारखी सोडून देण्यात आलेली पिलं आम्ही यशस्वीरीत्या वाढवली आहे," असं Beijing Wildlife Parkने म्हटलं आहे.
हे फोटो ट्विटरवरही हजारो लोकांनी शेयर केले.
.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)