झिंबाब्वे : निवडणूक हरल्यानंतर विरोधकांकडून हिंसा, राजधानी हरारेत गोळीबार

झिंबाब्वे

फोटो स्रोत, Getty Images

झिंबाब्वेमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर राजधानी हरारेमध्ये झालेल्या दंगलीत लष्करानं केलेल्या गोळीबारात 3 जण ठार झाले आहेत.

पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून लष्कराला तैनात करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

MDC या विरोधकांच्या आघाडीनं, रॉबर्ट मुगाबे यांच्या काळातल्या 'काळ्या दिवसां'ची आठवण होत असल्याचं म्हणत या दडपशाहीचा निषेध केला आहे.

सत्ताधारी Zanu-PF या पक्षानं या निवडणुकीत निकाल फिरवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सुमारे 37 वर्षें सत्ता राखलेल्या रॉबर्ट मुगाबे यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर झालेल्या पहिल्याच संसदीय निवडणुकीत Zanu-PF या त्यांच्या पक्षाला बहुमत मिळत असल्याचं निकालांतून स्पष्ट होत आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. परंतु, विरोधी MDC आघाडीनं त्यांचे उमेदवार नेल्सन चामिसा यांचा विजय झाल्याचा दावा केला आहे.

झिम्बाब्वे

फोटो स्रोत, Reuters

अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालासाठी लागत असलेल्या विलंबाबद्दल युरोपियन युनियनच्या निरिक्षकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

दोन्ही बाजूंचं म्हणणं काय?

"देशातलं वातावरण बिघडवून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यास विरोधक MDC आघाडी जबाबदार आहे," असं Zanu-PF पक्षाचे नेते आणि सध्याचे अध्यक्ष इमरसन मंगाग्वा यांनी म्हटल्याचं ZBC या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

झिम्बाब्वे

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर मंगाग्वा यांनी ट्वीटद्वारे शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

कायदा मंत्री झियाम्बी झियाम्बी यांनी म्हटलं की, हरारेमध्ये जमावाला पांगवण्यासाठी तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराला तैनात करण्यात आलं आहे.

तर, चामिसा यांच्या प्रवक्त्यानं लष्करानं केलेल्या गोळीबारात लोक ठार झाल्याच्या घटनेचा निषेध केला आहे.

झिंबाब्वे
फोटो कॅप्शन, लष्करी कारवाई

"जवानांना युध्दात शत्रूला ठार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. नागरिक हे देशाचे शत्रू आहेत का," असा सवालही प्रवक्त्यांनी केला आहे.

बीबीसी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांचं प्राबल्य असलेल्या हरारेच्या मध्यवर्ती भागापुरताच हा हिंसाचार मर्यादित आहे. देशात इतरत्र शांतता आहे. ताज्या माहितीनुसार, लष्करानं हरारेमधल्या परिस्थितीवर आता नियंत्रण मिळवलं आहे.

निकाल आतापर्यंत...

झिंबाब्वेच्या निवडणूक आयोगानं आतापर्यंत 200 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यापैकी Zanu-PF पक्षाला 140 तर MDC आघाडीला 58 जागा मिळाल्या आहेत. NRF आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाल्याची माहिती ZBC नं दिली आहे. देशाच्या संसदेच्या खालच्या सभागृहात एकूण 210 जागा आहेत.

झिंबाब्वे
फोटो कॅप्शन, निवडणुकांचे ताजे निकाल

एकूण मतदारांपैकी 70 टक्के मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं.

झिंबाब्वे
फोटो कॅप्शन, 70 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)