You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FIFA World Cup2018 : फ्रान्सच्या प्रशिक्षकांचा अनोखा विक्रम
फ्रान्सच्या टीमचे कोच डिडिए डेशॉम्प्स यांनी एक नवा विक्रम केलाय. पहिल्यांदा खेळाडू म्हणून आणि नंतर कोच म्हणून त्यांनी वर्ल्डकपवर नाव कोरलंय.
डेशॉम्प्स यांनी 20 वर्षांआधी पॅरिस येथे कर्णधार म्हणून वर्ल्ड कप म्हणून पटकावण्याचा मान मिळाला होता. काल रविवारी जेव्हा अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवलं तेव्हा प्रशिक्षकाच्या रुपात त्यांना पुन्हा हा बहुमान मिळाला.
फ्रान्सच्या फुटबॉल टीमचे प्रशिक्षक डिडिए डेशाँप्स हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग असणारी तिसरी व्यक्ती आहे.
49 वर्षीय डेशाँप्स यांचा ब्राझील चे मारियो जगालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबावर यांच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे.
दुर्मिळ योगायोग
एखाद्या टीमचा खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून हा बहुमान मिळवणं एक दुर्मिळ योगायोग आहे. मारियो जगालो यांनी खेळाडू असताना दोनदा वर्ल्ड कप जिंकला आणि 1970 मध्ये जेव्हा ब्राझीलने इटलीचा पराभव केला तेव्हा ते ब्राझीलचे प्रशिक्षक होते.
त्याचप्रमाणे फ्रान्झ बेकेनबाववर यांनी 1974 मध्ये खेळाडू म्हणून जर्मनीला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता तर 1990 मध्ये पश्चिम जर्मनीने अर्जेंटिना ला 1-0 ने मात दिली तेव्हा त्या टीमचे ते व्यवस्थापक होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)