फिफा वर्ल्ड कप 1018 - फ्रान्स विश्वविजेता, डेशाँप्स यांनी 20 वर्षांनंतर पुन्हा उचचला वर्ल्डकप

फोटो स्रोत, Reuters
रशियात झालेल्या FIFA वर्ल्डकपवर क्रोएशियाला हरवून फ्रान्सनं आपलं नाव कोरलं आहे. फ्रान्सनं चार तर क्रोएशियाने दोन गोल केले.
क्रोएशियानं हाफ टाइम होईपर्यंत चांगला खेळ केला. पण फ्रान्सनं आपली आघाडी कायम ठेवली. हाफ टाइम होईपर्यंत फ्रान्सनं क्रोएशियावर 2-1नं आघाडी मिळवली होती.
मॅचच्या 18व्या मिनिटालाच क्रोएशियाच्या मारियो मेंडजुकिचनं आत्मघातकी स्वयं गोल केला. त्यानंतर 28व्या मिनिटाला क्रोएशियाने गोल करून बरोबरी साधली.
हाफ टाइमच्या आधी 38व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. त्यात ग्रीजमॅननं गोल करून फ्रान्सला आघाडी 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 59व्या मिनिटाला पॉल पोग्बाने पुन्हा गोल केला. त्यानंतर फ्रान्सची स्थिती मजबूत झाली.

पण क्रोएशियाने अजूनही आशा सोडली नव्हती आणि ते झुंज देत राहिले. पण 65व्या मिनिटाला फ्रान्सने चौथा गोल केला.
चार मिनिटानंतर क्रोएशियाच्या मारियो मेंडजुकिचनं दुसरा गोल करून संघर्ष जागृत ठेवला, त्यामुळे हा सामना 70 व्या मिनिटाला 4-2 असा दिसत होता. पण हे पुरेसं ठरलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
फ्रान्सने आपलं डिफेन्स तगडं ठेवलं नि क्रोएशियाला हरवून वीस वर्षांनंतर वर्ल्डकप आपल्या नावी केला.

फोटो स्रोत, AFP
अर्जेंटिनाविरुद्ध चांगला खेळ करणारा एमबाप्पेने आज 65व्या मिनिटाला गोल केला. या ऐतिहासिक गोलमुळे तो पेलेनंतर फायनलमध्ये गोल करणारा दुसरा टीनएजर ठरला आहे. एमबाप्पे जेमतेम 19 वर्षांचा आहे.
त्याला सामन्याअखेरीस सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडूचा पुरस्कार मिळाला, तर मॉड्रिकला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. तर बेल्जियमचा गोलकीपर थिबॉट कोर्टिअस याला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार मिळाला आहे.
डिडिए डेशाँप्स यांचा नवा विक्रम

फोटो स्रोत, Getty Images
फ्रान्सच्या टीमचे कोच डिडिए डेशॉम्प्स यांनी एक नवा विक्रम केलाय. पहिल्यांदा खेळाडू म्हणून आणि नंतर कोच म्हणून त्यांनी वर्ल्डकपवर नाव कोरलंय. 20 वर्षांपूर्वी फ्रान्सने वर्ल्डकप जिंकला त्या वेळी डेशॉम्प्स त्या टीमचा भाग होते. आणि आता मॉस्कोमध्ये ते कोच असताना फ्रान्सने पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकला आहे.
ब्राझीलचे मारियो जगालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबावर यांनी यापूर्वी असा विक्रम केला आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








