कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी फेटाळला महिला पत्रकाराच्या विनयभंगाचा आरोप

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे एका महिला पत्रकाराची छेड काढल्याच्या आरोपावरून वादात सापडले आहेत. 2000 साली एका स्थानिक वृत्तपत्राबरोबर काम करताना या महिला पत्रकाराबरोबर ही घटना झाल्याचं वृत्त अलीकडेच आलं होतं.

2000 साली ब्रिटिश कोलंबियाच्या क्रेस्टनमध्ये, एका चॅरिटी कार्यक्रमात ट्रुडो उपस्थित होते. तेव्हा हा कार्यक्रम कव्हर करताना "आपला विनयभंग झाला होता," असं या महिलेने CBS न्यूजवर जाहीर केलेल्या एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.

याप्रकरणी आपण कुठलीही गैरवर्तणूक केली नाही, असं ट्रुडो यांनी ठामपणे सांगत या पत्रकाराचे आरोप फेटाळले आहेत.

तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणाने पुन्हा तोंड उघडलं ते एका ट्वीटमुळे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

क्रेस्टनमधल्या त्या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर एक आर्टिकल छापून आलं होतं. त्यात ट्रुडोंवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. या आर्टिकलचा फोटो एका ब्लॉगरने जूनमध्ये ट्वीट केला होता.

1 जुलैला पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर प्रथमच ट्रुडोंनी याबाबत वाच्यता केली. आपण त्या कार्यक्रमात कुठलीही चुकीची वर्तणूक केल्याचं आठवत नाही, असं ट्रुडो यावेळी म्हणाले.

गुरुवारी, आपल्या प्रतिक्रियेवर ठाम राहत ट्रुडो म्हणाले, "मी खूप विचार केला, आठवायचा प्रयत्न केला आणि मी ठाम आहे. मी नक्कीच असं काही गैर वागलो नाही."

त्यावेळी जर मी माफी मागितली असेल तर ती त्या महिलेला काही वेगळं नको वाटायला म्हणूनच, असंही ते म्हणाले. "एकाच घटनेकडे पाहण्याचा वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो."

ट्रुडो तेव्हा 28 वर्षांचे होते आणि ते शिक्षक होते. 1998 साली भावाच्या मृत्यूनंतर ते Avalanche Foundation या चॅरिटी संस्थेशी जोडले गेले होते, या संस्थेनीच त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

त्यानंतर Creston Valley Advance वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या त्या आर्टिकलमध्ये "ट्रुडो यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने हात लावून आपला अपमान केला", असा उल्लेख एका पत्रकाराने केला होता.

ट्रुडो यांनी त्यावेळी माफी मागितली होती, असं सदर पत्रकाराने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. "आपण हे प्रकरण लांबवण्यास इच्छुक नाही, आणि तेव्हाही नव्हतो," असं त्या म्हणाल्या. त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)