बलाढ्य स्पेनही वर्ल्डकप स्पर्धेबाहेर; रशियाचा दमदार विजय

रशिया आणि स्पेन यांच्यात झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात रशियाने ने स्पेनचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-3 असा पराभव केला.

रशियाचा गोलकीपर इगोर अफीनवफीव यांनी दोन पेनल्टी गोलचा शानदार बचाव केला आहे. दुसऱ्या बाजूला स्पेनचे कोके आणि लागो स्पास पेनल्टी गोल करण्यात अयशस्वी ठरले.

राऊंड 16 च्या अखेरच्या सामन्यात निर्धारित 90 मिनिटांपर्यंत 1-1 ने बरोबरीत होता. त्यानंतर एक्सट्रा टाइममध्ये सुद्धा कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शुट आऊटची वेळ आली.

एखाद्या मोठ्या स्पर्धेत पेनल्टी शूट आऊटपर्यंत पोहोचण्याची रशियाची ही पहिलीच वेळ होती.

वर्ल्ड कपमध्ये रशियाचा प्रवास

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रशियाने सौदी अरेबियाचा 5-0 असा पराभव केला. त्यानंतर इजिप्तचासुद्धा पराभव केला. पण ग्रुपच्या शेवटच्या सामन्यात त्यांना उरुग्वेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

यजमान रशियानं सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर पहिल्यांदाच अंतिम आठ संघात प्रवेश मिळवला आहे. 21व्या वर्ल्ड कपची हे आणखी एक वेगळेपण.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)