You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्जेंटिना वर्ल्डकपमधून बाहेर; मेस्सीचं स्वप्न अधुरंच
वर्ल्ड कपच्या नॉक आऊट फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स ने अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला.
अतिशय रोमांचक अशा सामन्यात सात गोल बघायला मिळाले. हाफ टाइमपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. पण दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने आक्रमक खेळ करत तीन गोल केले. त्यातील दोन गोल कॅलियन बॅप्पे याने केले.
इंज्युरी टाइममध्ये अर्जेंटिनाने एक गोल केला पण तोवर सामना त्यांच्या हातातून गेला होता.
पहिला गोल पेनल्टीने
मॅचच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिनाचं सामन्यावर वर्चस्व होतं. नवव्या मिनिटातच त्यांचा फॉर्वर्ड खेळाडू अँटोनी ग्रीझमॅनचा शॉट गोलपोस्टला लागून परत आला.
11व्या मिनिटाला मार्को रोजोनी अर्जेंटिनाच्या बॉक्समध्ये फ्रान्सचा मिडफिल्डर कॅलिअन बप्पेला पाडलं. त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली. सामन्याच्या 13व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमॅन पेनल्टी चा फायदा घेत गोल केला आणि आपल्या टीमला बढत मिळवून दिली.
बरोबरीत आणला सामना
त्यानंतर अर्जेंटिनाने सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. 41 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचे मिडफिल्डर अँजेल डी मारियाने 30 यार्डावरून एक गोल केला आणि सामना बरोबरीत आणला. हा त्याचा स्पर्धेतला दुसरा गोल होता.
अर्जेंटिनाला लगेच आठ मिनिटात बढत
दुसऱ्या हाफममध्ये 48व्या मिनिटाला मेस्सीने दिलेल्या पासवर मकार्डोनं गोल केला आणि टीमला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आठ मिनिटांनंतर फ्रान्सनं लगेच दुसरा गोल केला आणि पुन्हा सामना बरोबरीत आला.
57व्या मिनिटाला फ्रान्सकडून दुसरा गोल डिफेंडर बेंजामिन पावर्डने केला. हा त्याचा स्पर्धेतला पहिला गोल होता.
या पराभवाबरोबर अर्जेंटिना स्पर्धेच्याबाहेर गेला आहे आणि फ्रान्सची टीम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)