रशियातल्या या 11 अफलातून शहरांत होणार फुटबॉल वर्ल्ड कप - पाहा फोटो

यावर्षी रशियातल्या वेगवेगळया शहरात फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. त्यापैकी एक फुटबॉल स्टेडियम हे दुसऱ्या महायुद्धातल्या रणभूमीवर बांधलं आहे.

1. मॉस्को

राजधानी मॉस्कोच्या अगदी मध्यवर्ती भागात ऐतिहासिक क्रेमलिनची भव्य इमारत आहे. या इमारतीत 5 महाल आहेत, तर जवळच 2,000 वर्षांपूर्वींचे चार कॅथेड्रल्स आहेत.

मॉस्को शहरातले मेट्रो स्टेशन पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यापैकी सर्कल लाईन स्टेशन सगळ्यांत भारी आहे.

2. सेंट पिटर्सबर्ग

या शहरात पर्यटन स्थळं पाहण्यासाठी सगळ्यात स्वस्त पर्याय म्हणजे ट्राम नंबर 3.

उन्हाळ्यात या ठिकाणी तब्बल 19 तास सूर्यप्रकाश राहतो. उन्हाळ्यात दिवसरात्र शहर गजबजलेलं राहतं. रस्त्यावर कॅफे, मनोरंजानाची ठिकाणं असं सगळीकडे लोकांची लगबग पाहायला मिळते.

3. निझनी नोव्हगोरॉट

व्होल्गा नदी काठच्या रस्ते दोन्ही बाजूंनी लोककलेनं नटलेले दिसतील. शहराची खरी मजा घ्यायची असेल तर तिथल्या जुन्या लाकडी घरांपासून एक तरी फेरफटका नक्की मारा.

4. कॅलिनिनग्राड

पोलंड, लिथुएनिया, बाल्टिक समुद्र यामध्ये या शहराचं सँडविच झालं आहे.

कॅलिनीनग्रॅड हे रशियाच्या पश्चिमेचं सर्वात शेवटचं शहर आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध तत्वज्ञ इमॅनुएल कांत यांनी शेवटचा श्वास घेतला होता.

5. येकातेरिनबर्ग

सोव्हिएत काळतल्या वास्तुरचनेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.

उरल पर्वतावरचं हे शहर पॅरिससारखं दिसतं.

6. व्होल्गोग्राड

याआधी या शहराचं नाव स्टॅलिनग्राड होतं. दुसऱ्या महायुद्धाची ही एक मोठी रणभूमी होती. हजारो लोक आणि सैनिकांना इथे प्राण गमवावा लागला होता.

या शहरात दुसऱ्या महायुद्धाला समर्पित केलेली अनेक संग्रालय आहेत. इथल्या स्टेडियमचं बांधकाम करताना आजही दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांचं अवशेष मिळत आहेत.

7. कझान

कझान हे रशियाचं सहावं सगळ्यांत मोठं शहर आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात मोठे पार्क आहेत.

इथे विविध सांकृतिक जीवनाचा अनुभव येतो.

8. समारा

ऐसपैस लाकडी घराच्या शेजारीच तुम्हाला मोठे बिझनेस टॉवर्स दिसतील, अशी या शहराची रचना आहे.

9. रोस्टोव्ह

या शहरातल्या रोन नदीवर फेरफटका मारायला विसरू नका. सेंट्रल मार्केट, कॅफे आणि इथल्या कॅथेड्रललाही नक्कीच भेट द्यायला हवी.

10. सोची

हे शहर एका दिवसात फिरून होत नाही, कारण इथली प्रेक्षणीय स्थळं एकमेकांपासून दूर आहेत.

स्वच्छ आणि आल्हाददायक हवामान, पर्वतावरून दिसणारा सुंदर नजारा, कॅफे अशा गोष्टींनी इथली भेट आठवणीत राहते.

11. सारन्स्क

बहुतेक सर्व प्रेक्षणीय स्थळं आणि करमणुकीच्या गोष्टी इथल्या फुटबॉल स्टेडियमपासून जवळच आहेत.

या ठिकाणचा मांसाहाराची चव घ्यायला विसरू नका.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)