दक्षिण चीन समुद्र : 6 देशांतील वाद समजून घ्या 9 मुद्द्यांत

दक्षिण चीन समुद्र

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण चीन समुद्रावरून चीन आणि अमेरिका यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केलं. त्यावर अमेरिकेने टीका केली, त्याला चीननंही प्रत्युत्तर दिलं आहे.

दक्षिण चीन समुद्रावरील ताब्यावरून चीन, तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रनेई यांच्यात गेली अनेक वर्षं वाद सुरू आहे. चीननं या भागात बेट उभारलं असून नौदल मोठ्या प्रमाणावर तैनात केलं आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी, चीननं या भागात केलेली लष्करी जमावाजमव शेजारी राष्ट्रांना भीती दाखवण्यासाठी आहे आणि चीनच्या दीर्घकालीन उद्देशांवर शंका उपस्थित करणारी आहे, अशी टीका केली होती. याला उत्तर देताना चीनचे लष्करी अधिकारी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल हे ली यांनी अमेरिकेचे विधान बेजाबदारपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

मॅटिस यांनी सिंगापूरमधील एका महत्त्वाच्या सुरक्षा परिषदेत हे विधान केलं होतं. ही टीका करत असतानाच मॅटिस म्हणाले की, अमेरिका चीनसोबत सकारात्मक आणि परिणामकारक सहकार्य यावर भर देत आहे.

दक्षिण चीन समुद्र

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, स्प्राटली बेट समुहांनजीक 2015मध्ये चीनच्या नौदलाची जहाजं दिसली होती.

तर याच परिषदेत ली म्हणाले, "चीनला स्वतःच्या प्रदेशात सैन्य तैनात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. चीनच्या राष्ट्रीय संरक्षण धोरणाचा हा भाग आहे. स्वतःच्या प्रदेशांवर इतरांनी आक्रमण करू नये, यासाठी खबरदारीची ही उपाययोजना आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप येत्या काही दिवसांतच उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मॅटिस यांच्या या वक्तव्याला महत्त्व आलं आहे.

चीन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चीननं वुडी बेटावर लष्करी विमान उतरवलं. त्याचं हे उपग्रह छायाचित्र.

गेल्या महिन्यात पॅरसेल बेट समूहांतील वुडी बेटावर लष्करी विमान उतरवलं होतं. यावर चीन या प्रदेशात अस्थिरता निर्माण करत आहे, अशी टीका अमेरिकेनं केली होती. वुडी बेटावर मालकीचा चीनसह तैवान आणि व्हिएतनामनं दावा केला आहे.

नेमका वाद काय आहे?

1. दक्षिण चीन समुद्र हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहेच, शिवाय मासेमारीसाठी हा भाग समृद्ध मानला जातो. इथं मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठे असल्याचं मानलं जातं.

2. पॅरसेल्स आणि स्प्रॅटलीस या दोन साखळी बेटांवर हक्क कुणाचा यावरून हा वाद सुरू आहे. चीन, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि मलेशिया यांच्यात हा वाद आहे.

3. चीनने या समुद्रातील मोठ्या भागावर मालकीचा दावा केला आहे. गेल्या काही शतकांपासून हा प्रदेश आपल्या मालकीचा असल्याचा चीनचा दावा आहे. 1947ला चीनने या समुद्रावर दावा करणारा नकाशा सादर केला होता.

4. चीनच्या दाव्याला व्हिएतनामचा जोरदार आक्षेप आहे. या बेटांवर 1940पूर्वी चीनने कधीही सार्वभौमत्वाचा दावा केला नव्हता. या दोन्ही साखळी बेटांवर व्हिएतनामने 17व्या शतकांपासून राज्य केलं आहे, असा व्हिएतनामचा दावा आहे.

5. स्प्रॅटलीस बेटांवर फिलिपाईन्सनेही हक्क सांगितला आहे. चीन आणि स्कॅरब्रो शॉलवरही चीन आणि फिलिपाईन्सने दावा केला आहे.

6. मलेशिया आणि ब्रुनेई या दोन्ही देशांचा दक्षिण चीन समुद्रामधील काही भूभागावर दावा केला आहे.

7. स्प्रॅटलीस बेट समूहांतील काही बेटांवर मलेशियाने हक्क सांगितला आहे.

8. हा वाद द्विपक्ष चर्चेतून सोडवला जावा असं चीन सांगतं. पण चीनचा एकूण भौगोलिक आकार लक्षात घेता इतर देशांचा याला विरोध आहे.

9. चीनने द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट असोसिएशनशी चर्चा करावी. याला चीनचा विरोध आहे.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)