You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑ! कोका कोलानं बाजारात आणली नवी 'दारू'
125 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोका कोला या शीतपेय कंपनीनं स्वतःचं मद्य बाजारपेठेत आणलं आहे.
जपानमध्ये कोका कोला कंपनीनं लेमन फ्लेवरचं अल्कोपोप हे मद्य बाजारात आणलं आहे. कोका कोला हे पहिल्यांदाच करत असून जपानमधल्या नवीन बाजारपेठेवर ताबा मिळवण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.
सोमवारी कंपनीनं तीन फिझी लेमन ड्रिंक्स बाजारात उतरवलेत.
तरुणांना विशेषतः महिलांना नजरेसमोर ठेऊन कंपनीनं हे अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट आणले आहेत.
या प्रॉडक्टविषयी कोका कोलातर्फे कंपनीच्या 125 वर्षांच्या इतिहासातली 'अद्वितीय कामगिरी' असा उल्लेख करण्यात आला आहे. या ड्रिंक्समध्ये 3 टक्के ते 8 टक्के अल्कोहोलचं प्रमाण असणार आहे.
कंपनीच्या परंपरेप्रमाणे या ड्रिंक्सची रेसिपी गुप्त ठेवण्यात आली आहे. असं असल तरी सध्या जपानमधल्या लोकप्रिय चु ही (Chu-Hi) या पेयाच्या धर्तीवरच कोका कोलाचं नवीन प्रॉडक्ट असेल.
चु ही पेयाचं प्रस्थ वाढत आहे. या पेयामध्ये शोचू नावाचं एक स्थानिक मद्य आणि फळांचे फ्लेवर्स मिसळलेले असतात. ज्यानं थोडी नशा चढते.
Chu-Hi हे Shochu Highball चा शॉर्ट फॉर्म आहे. ते बिअरला पर्याय म्हणून विकलं जात होतं आणि स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
जपानच्या किरीन, सनट्रॉय आणि असाही यासारख्या मोठ्या ब्रँड्सकडे या वर्गात मोडणारं पेयं आहे. आणि ते अजूनही वेगवेगळ्या प्रकारांबरोबर प्रयोग करत असतात.
सर्वांत लोकप्रिय स्ट्राँग फ्लेवर्समध्ये द्राक्ष आणि लिंबू यांचा समावेश आहे. नंतर कोका कोलाच्या फ्लेवर्सचा क्रमांक येतो. कंपनीला आता त्यांचा बाजारातला हिस्सा वाढवायचा आहे.
हे पेय जपानच्या बाहेर विकण्याचं नियोजन सध्यातरी नसल्याचं कोका कोलानं स्पष्ट केलं आहे.
1990च्या काळात युरोप आणि UKमध्ये स्मरनॉफ आईस आणि बकार्डी ब्रिझर बरंच लोकप्रिय होतं. त्याच काळात अल्कोपोप पेयाची लोकप्रियता वाढली.
शीतपेयासारखीच चव असल्यामुळे तरुणाईच्या अल्कोहोल पिण्याला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा वादही यामुळे उद्भवला होता.
गेल्या नोव्हेंबरमध्येच 'वेल्स फारगो'चे विश्लेषक बोनी हारझॉग यांनी असा अंदाज बांधला होता की, कोका कोला लवकरच दारूचं उत्पादन करेल, कारण ते आता प्रौढांसाठीच्या क्राफ्ट पेयांसारख्या प्रिमिअम वर्गाकडे लक्ष देत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)