पाहा फोटो : आज पहाटे तुम्ही साखरझोपेत असताना कोरियात इतिहास घडत होता...

भारतीय वेळेनुसार सकाळी साडे पाच वाजता उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन दक्षिण कोरियात पोहोचले. 1953ला झालेल्या कोरियाई युद्धानंतर दोन्ही देश वेगळे झाले होते. त्यानंतर या दोन्ही देशांत टोकाचं वैर होतं. त्यांच्या भांडणामुळे जगात दोन तट पडण्याची भीती निर्माण झाली. पण आज एक नवी सुरुवात झाली आहे.

प्रथमच उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यानं दक्षिण कोरियाच्या भूमीवर आपले पाय ठेवले आहेत. दक्षिण कोरियातल्या पनमुनजोम येथे सैन्यविरहित क्षेत्रात दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट झाली.

पनमुनजोम येथे सैन्य सीमारेषा पार करून पीस हाऊसकडे चर्चेसाठी जाताना दोन्ही नेते.

कोरियाच्या सरकारी टीव्हीने एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओत दोन्ही नेते मुलांसोबत दिसत आहेत.

किम जाँग-उन यांनी सीमेपर्यंत कारने प्रवास केला.

"तुम्हाला भेटून आनंद झाला," असं मून जे इन यांनी किम जाँग-उन यांना म्हटलं. दोन्ही देशांमध्ये अणू कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

किंग जाँग-उन यांच्यासोबत त्यांचं शिष्टमंडळ देखील आहे.

कोरियाई युद्धामुळे विभक्त झालेल्या 60,000 लोकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबतही चर्चा होणार आहे.

उत्तर कोरियामध्ये डांबून ठेवलेल्या विदेशी नागरिकांच्या सुटकेबाबतही चर्चा होऊ शकते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)