नको असलेल्या मीटिंगमधून चालते व्हा! उत्पादन वाढवण्यासाठी टेस्लाचा नवा फॉर्म्युला

एलन मस्क

फोटो स्रोत, Reuters

उत्पादनक्षमता वाढवायची असेल, तर बिनकामाच्या मीटिंगा बंद करा, वेळ घालवणाऱ्या, नको असलेल्या मीटिंगमधून सरळ बाहेर पडा, असा सल्ला दिला आहे एलन मस्क यांनी. ते टेस्ला मोटर्स या बड्या कंपनीच्या प्रमुखांनी.

पुढच्या काही महिन्यांमध्ये टेस्लाच्या उत्पादक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी कंपनीचे मुख्याधिकारी एलन मस्क यांनी एक निर्णय घेतला आहे. बिनकामाच्या मीटिंग्ज कमी करण्याचा.

ज्या मीटिंग्जमुळे आणि फोन कॉल्समुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो पण उत्पादकतेमध्ये वाढ होत नाही, अशा बैठका कमी करण्यात याव्यात असं ते म्हणाले.

कॅलिफोर्नियातल्या टेस्ला प्लांटचं उत्पादन वाढावं यासाठी हा प्लांट अद्ययावत करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या इथलं काम काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे. जूनच्या अखेरपर्यंत दर आठवड्याला 2000 ते 6000 कारची निर्मिती व्हावी हे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्लांट अद्ययावत करण्यात येणार आहे.

उत्पादन क्षमतेमध्ये वाढ व्हावी यासाठी एलन मस्क यांनी काही सूचना दिल्या आहेत. जसं की मीटिंगमधून फार काही हाती लागणार नाही असं जर वाटत असेल तर मीटिंग सोडून जाणं, दरवेळी वरिष्ठांच्या आदेशांचं वाट पाहत ताटकळत न बसणं किंवा कंपनीच्या छोट्या मोठ्या नियमांकडं दुर्लक्ष करणं चालू शकेल चालेल असं त्यांनी म्हटलं आहे.

एलन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

कंपनीला तोट्यातून नफ्यात आणण्याच्या दृष्टीनं Model 3 च्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणं हे महत्त्वपूर्ण आहे पण कंपनीला याआधी आपली उद्दिष्टं गाठता आली नाहीत हे देखील तितकंच खरं आहे.

एलन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेला एक इमेल लीक झाला आहे. हा इमेल 'इलेकट्रेक'नं प्रसिद्ध केला आहे. या इमेलमध्ये एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना फटकारल्याचं दिसतं. कामाच्या कंटाळ्यामुळं कंपनीला गंभीर परिणाम भोगावे लागले असल्याचं या इमेलमध्ये म्हटलं आहे. तसंच, भविष्यात खर्चावर देखील करडी नजर ठेवली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

"आवश्यकता नसलेल्या मोठ्या मीटिंग उत्पादकतेवर परिणाम होतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे. मीटिंग सोडून जाणं हे उद्धटपणाचं नाही तर एखाद्याला मीटिंगला बसवून ठेवणं आणि त्याचा वेळ वाया घालवणं हे उद्धटपणाचं लक्षण आहे," असं त्यांनी आपल्या इमेलमध्ये म्हटलं आहे.

टेसला

फोटो स्रोत, Tesla

फोटो कॅप्शन, Model 3 या इलेक्ट्रिक कारचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून टेसलाला आपले पाय घट्ट रोवायचे आहेत.

Model 3 या इलेक्ट्रिक कारचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून टेस्लाला आपले पाय घट्ट रोवायचे आहेत पण मागणीच्या प्रमाणात उत्पादन करता न आल्यामुळं त्यांच्यावर कामाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे.

कंपनीमध्ये ऑटोमेशनचा जास्त वापर केल्याचा फटका बसला असल्याची कबुली मस्क यांनी दिली आहे. ऑटोमेशनचा अतिवापर करण्याची माझ्याकडून चूक झाली. मी मानवाच्या क्षमतांना कमी लेखलं असं ते म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

नव्या पद्धतीचा अवलंब केल्यावर तसेच अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबल्यावर Model 3 कारचं उत्पादन आठवड्याला किमान 3,000 ते 4000नं वाढू शकतं असं इमेलमध्ये म्हटलं आहे. हे उद्दिष्ट आपल्याला पुढच्या महिन्यात गाठता येऊ शकतं. पण सिस्टीम आणखी अपग्रेड केल्यास जूनच्या शेवटपर्यंत आठवड्याला 6000 कारचं उत्पादन करता येऊ शकतं असं ते म्हणतात.

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी टेस्लाच्या फ्रेमंट कार प्लांटमध्ये नोकरभरती केली जाणार आहे असा अंदाज आहे.

खर्चात कपात

अनावश्यक खर्चात कपात करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. खर्चावर करडी नजर ठेवण्यात यावी. मग भलेही तो खर्च कितीही क्षुल्लक का असेना अशा सूचना मी आपल्या फायनान्स टीमला दिल्या आहेत असं त्यांनी इमेलमध्ये म्हटलं आहे.

जे काम बाहेर काँट्रॅक्टर्सना दिलं जातं त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे असं ते सांगतात. काँट्रॅक्टिंग करणाऱ्यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची ही अखेरची संधी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. टेस्लाच्या स्टॅंडर्डप्रमाणं या काँट्रॅक्टर्सचं काम नसेल तर सोमवारपर्यंत त्यांचं काँट्रॅक्ट रद्द करण्यात येईल असं त्यांनी इमेलमध्ये म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांच्या दबावामुळं टेस्लाची परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यात, कंपनीनं तयार केलेल्या कारचा अपघात झाला. ऑटोपायलट मोडवर कार चालत असताना झालेल्या या अपघातात कार चालकाला आपले प्राण गमवावे लागले. यामुळं कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला.

"कंपनीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले तरी पण आम्हाला पैसे उभे करता आले नाहीत त्यामुळं अत्यंत खेदानं आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आम्ही दिवाळखोर झालो आहोत," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तणावाखाली असल्याची कबुली

आपण तणावाखाली जात आहोत अशी कबुली त्यांनी CBS न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. कधीकधी मी कार प्लांटमध्ये असलेल्या कोचावरच झोपतो असं ते म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)