कर्नाटक निवडणूक : बंगळुरूच्या नागरिकांचा स्वतःचा जाहीरनामा

बंगळुरू जाहीरनामा
    • Author, शालू यादव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

निवडणूक आली की राजकारणी लोक त्यांचा जाहीरनामा घेऊन तुमचं मत मागण्यासाठी तुमच्या दारात येतात. पण नागरिकांनी राजकारण्यांसाठी आपला जाहीरनामा बनवल्याचं कधी ऐकलं आहे का?

बंगुळूरमधील नागरिकांनी पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा जाहीरनामा बनवला आहे. क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून बनवण्यात आलेला हा जाहीरनामा निवडणूक लढवलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांना देण्यात आलेला आहे. 'सिटिझन्स फॉर बंगळुरू' या संस्थेने हा जाहीरनामा बनवला आहे.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना एकत्र आणून शहरवासीयांनी रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून हा जाहीरनामा आकाराला आला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - 'कर्नाटक जिंकायचं असंल तर आमचा जाहीरनामा वाचा'

सखोल चर्चा करून हा जाहीरनामा बनवण्यात आला आहे. 'बंगळुरू बेकू' म्हणजे 'बंगळुरूला हे हवं आहे' असं या जाहीरनाम्याचं नाव आहे.

यामध्ये वाहतूक कोंडी, रस्ते, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन अशा विविध विषयांचा यात समावेश करण्यात आला आहे.

या संघटनेच्या सदस्य असलेल्या डॉ. अर्चना प्रभाकर म्हणाल्या, "निवडणुकीच्या आधी राजकारणी लोक येतात आणि मतं मागतात. याच वेळी ते आमच्यासाठी काय केलं आहे, याची माहिती देतात. पण हे काम गेल्या पाच वर्षांत किंवा त्यांच्या कार्यकाळात केलेलं नसतं. निवडणुकीच्या आधी ते सारं काही सुधारण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने आपण अशा राजकारण्यांनाच मतं देतो."

अर्चना आणि पती

या जाहीरनाम्याचा उद्देश राजकारण्यांपर्यंत पोहोचणं आणि नागरिकांचा आवाज ऐकला जावा यासाठी प्रयत्न करणे हा आहे.

अर्चना म्हणतात, "हा जाहीरनामा लोकांनी राजकारण्यांसाठी बनवलेला आहे."

या जाहीरनाम्यात कचरा, स्वच्छता, पादचाऱ्यांचे हक्क, प्रदूषण, घरं, सुशासन यांचा समावेश आहे.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हिडीओ : बेंगळुरूच्या समस्या सोडवण्यासाठी यांना मुख्यमंत्री व्हायचंय

"राजकारण्यांना समजलं पाहिजे की, नागरिक शांत राहणार नाहीत. आपल्या हक्कांसाठी बोलणं हा आमचा अधिकार आहे. पण त्याच वेळी नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे" अर्चना सांगतात.

त्या पुढे सांगतात, "निवडणुका आणि राजकारणी यांच्याबद्दलचा माझा दृष्टिकोन गेल्या निवडणुकीपर्यंत नकारात्मक होता. पण राजकारण्यांकडे बोट दाखवणं आणि आणि त्यांना जबाबदार धरणं सोपं आहे, हे उमगलं. त्यापेक्षा काही उपाययोजना आखण्याचा भाग होणं जास्त आव्हानात्मक आणि समाधान देणारं आहे."

"राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमच्या दारात येतात तेव्हा आमचा जाहीरनामा पाहून ते गोंधळून जातात. त्यांना कळतं की आता 'चलता है' ही प्रवृत्ती चालणार नाही." असंही त्यांनी सांगितलं.

बंगळुरू जाहीरनामा

काही दिवसांपूर्वी अर्चना, त्यांचे पती आणि या संघटनेतील इतर सदस्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना भेट देऊन त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. भाजपसह इतरही सर्व पक्षांनी हा या जाहीरनाम्याचं स्वागत केलं आहे.

आता राजकीय नेते या जाहीरनाम्यातील किती मुद्दे स्वतःच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात घेतात हे पाहावं लागेल.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बीबीसीनं कोणत्या विषयावर वार्तांकन करावं असं तुम्हाला वाटत का?

व्हीडिओ कॅप्शन, बीबीसी न्यूज पॉप अप @ कर्नाटक

#BBCNewsPopUp आणि KarnatakaElections2018 हे हॅशटॅग वापरून तुम्ही फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोहोचू शकता.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)