या फोटोंनी बदललं अनेकांचं आयुष्य!

लुईस हाईन यांच्या संग्रहामधल्या 24 फोटोंचा न्यूयॉर्कमध्ये लिलाव करण्यात आला. न्यूयॉर्कमधले दिवंगत फोटोग्राफर इसाडोअर एसवाय सेडमन यांनी या फोटोंचा संग्रह केला होता.

अमेरिकन समाजशास्त्रज्ञ हाईन हे विसाव्या शतकातील महत्त्वाचे फोटोग्राफर होते. त्यांनी फोटोचं माध्यम वापरलं, त्यांना शब्दांची जोड दिली आणि त्यांना भावलेल्या गोष्टी फोटोंच्या माध्यमातून सांगितल्या.

हाईन यांनी फोटोग्राफीच्या या प्रकल्पाला 'फोटो स्टोरीज' असं नाव दिलं.

हाईन यांनी काढलेली ही काही छायाचित्रं कॅरोलिनास, न्यूयॉर्क आणि पिट्सबर्ग शहरातली गरिबी दाखवणारी आहेत.

हाईन यांनी त्यांच्या एकेका प्रोजेक्ट्वर अनेक वर्षं काम केलं. 1904 साली एलिस आयलंडवर स्थलांतर करणाऱ्या लोकांचं दस्तावेजीकरणाचं काम सुरू होतं.

तिथं आलेल्या कुटुंबाचा 'मानवी चेहरा' त्यांनी जगासमोर मांडला. या स्थलांतरितांच्या मनात न्यूयॉर्ककरांनी चांगलंच भय निर्माण केलं होतं.

फोटोसाठी परवानगी मिळाल्यानंतर हाईन फोटो टिपत. त्याची तयारी करत. फ्लॅश मारल्यावर एक मोठा आवाज व्हायचा आणि मग नाट्यमय धूर बाहेर पडायचा.

सामाजिक संस्था, पुरोगामी प्रकाशनं आणि काही महामंडळांनी हाईन यांना त्यांच्यासाठी फोटोग्राफर म्हणून नेमलं होतं.

'एम्पायर स्टेट बिल्डिंग'चं बांधकाम करणाऱ्या कामगारांचे हाईननं काढलेले फोटो जगविख्यात ठरले.

1908मध्ये 'नॅशनल चाईल्ड लेबर कमिटी'चे फोटोग्राफर झाल्यावर त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या मुलांचे फोटो काढले.

तेच फोटो नंतर बालशोषण कमी करण्यासाठी वापरण्यात आले.

यामुळे कारखान्याचे मालक हाईनचा तिरस्कार करायचे. मालकांच्या नकळत ते कारखान्यात प्रवेश करायचे. बऱ्याचदा त्यांना धमकावण्यातही आलं होतं.

हाईन यांच्या फोटोंमुळे अमेरिकेच्या बालमजुरी कायद्यात क्रांती घडली. या फोटोंमुळे 20व्या शतकातील सामान्य माणसं आणि कामगारांची स्थिती प्रकाशझोतात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)