अल निनो नसतानाही 2017 ठरलं सर्वाधिक उष्ण वर्ष

नैसर्गातील मानवी हस्तक्षेप आपल्या आसपासचं वातावरणच नव्हे तर जमिनीचा एकंदरीत पोतच बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत.

नैसर्गिक प्रक्रियांमधील मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि ब्रिटनच्या हवामान विभागानं या बाबीला दुजोरा दिला आहे की, अल निनोचा प्रभाव नसतानाही 2017 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वांत उष्ण वर्ष ठरलं आहे.

या दोन्ही संघटनांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2017 हे आतापर्यंतचं सर्वाधिक दुसऱ्या अथवा तिसऱ्या क्रमांकाचं उष्ण वर्ष ठरलं होतं.

167 वर्षांच्या आकडेवारीचा बारकाईनं अभ्यास करून तयार करण्यात आलेला हा अहवाल चिंता वाढवणारा आहे.

निसर्गावर माणसाचं आक्रम

ब्रिटनच्या हवामान विभागाचे कार्यकारी संचालक पीटर स्टॉट यांच्या मते, "या आकडेवारीमध्ये लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे अल निनोचा प्रभाव जाणवत नसतानाही 2017 हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांतलं एक ठरलं आहे.

"याचा अर्थ स्पष्ट आहे की, नैसर्गिक प्रक्रियांवर मानवी हस्तक्षेप वरचढ ठरत आहे", असं स्टॉट म्हणाले.

मागील वर्ष हे 1998 सालापेक्षाही अधिक उष्ण होतं. असं असलं तरी 1998 मध्ये जमिनीच्या वाढलेल्या तापमानासाठी अल निनोला जबाबदार धरण्यात आलं होतं.

नासानं त्यांच्या अभ्यासात दावा केला आहे की, अल निनोमुळे अंटार्क्टिकावर दरवर्षी दहा इंच बर्फ वितळत आहे.

हवामानाचं चक्र बिघडलं

शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं की, "अल निनोमुळे समुद्राच्या उबदार पाण्याचा प्रवाह अंटार्क्टिकाच्या दिशेनं होतो आहे. त्यामुळे अंटार्क्टिकातलं बर्फ वितळत आहे."

प्रशांत महासागराचा पूर्व भाग म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या महासागरातील तापमान वाढल्यानं अल निनोची परिस्थिती उद्भवते. यामुळेच हवामानाचं सामान्य कालचक्र बिघडतं. पूर आणि दुष्काळासारखी वाईट परिस्थिती ओढावते. याच अल निनोमुळे भारतात मान्सूनचा पॅटर्न बदलतो, असं काही अभ्यासकांची चिंता आहे.

"चिंता यामुळे वाटते की, 1850 नंतरच्या सर्वाधिक उष्ण 18 वर्षांतील 17 वर्षं याच शतकातील आहेत", असं जागतिक हवामान विभागातील शास्त्रज्ञ उमर बद्दौर यांनी सांगितलं.

शास्त्रज्ञ उमर बद्दौर यांचं म्हणणं आहे की, "सर्वाधिक उष्ण वर्षांची क्रमवारी ही काही मोठी बातमी नाही. मोठी बातमी आणि मोठा प्रश्न आहे यासंबंधीचा ट्रेंड."

याचा अर्थ तुम्हाला आता या उष्णतेचा कल जाणून घ्यावा लागणार आहे. तसंच बर्फासारख्या समुद्रासाठी विशेष असलेल्या इतर बाबींवर याचा काय परिणाम होत आहे हेही समजून घ्यावं लागणार आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)